आष्टी मधील औषधनिर्माताचा गौरव करून “जागतिक औषध निर्माता दिन” साजरा

बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क करा. संपर्क : 9226040506

आष्टी मधील औषधनिर्माताचा गौरव करून “जागतिक औषध निर्माता दिन” साजरा

आष्टी शहरांमध्ये 400 विद्यार्थीयांची रॅली काढून आरोग्या विषयी केली घोषणा देऊन जनजागृती

आष्टी : आनंद चॅरिटेबल संस्था संचलित कॉलेज ऑफ फार्मसी आष्टी (डी. फार्मसी) व कॉलेज ऑफ फार्मासूटिकल सायन्स अँड रिसर्च आष्टी (बी फार्मसी ) येथे 25 सप्टेंबर जागतिक औषध निर्माता दिन दरवर्षीप्रमाणे यावर्षीही साजरा करण्यात आला त्यामध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते . 24 सप्टेंबर या दिवशी ग्रामीण रुग्णालय आष्टी येथील लॅब इन्चार्ज जयचंद नलावडे व त्यांचे इतर कर्मचारी यांच्या सहकार्याने सर्व विद्यार्थ्यांचे कॉलेजमध्ये हिमोग्लोबिन व ब्लड ग्रुप, व इतर चाचण्या करण्यात आला तसेच दुपारी रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आलं होते रांगोळी स्पर्धेमध्ये फार्मासिस्ट ही थीम होती. त्यामध्ये प्रथम क्रमांक लगड राजनंदिनी व मंदिलकर मनीषा( द्वितीय वर्ष बी फार्मसी) तसेच द्वितीय क्रमांक पाटील विकास व येरपुडे तेजस (द्वितीय वर्ष बी फार्मसी) व तृतीय क्रमांक मानसी जाधव व ऋतुजा कोकणे (अतिम वर्ष डी फार्मसी) या विद्यार्थ्यांनी पटकावला. रविवार दिनांक 25 सप्टेंबर जागतिक औषध निर्माता दिन या दिवशी आष्टी मधील मेडिकल शॉप द्वारे जनतेची सेवा करत असलेले औषधनिर्माता (फार्मासिस्ट) यांचा कॉलेजला बोलून गौरव सन्मान चिन्ह देऊन करण्यात आला. त्यामध्ये संजय मेडिकलचे औषधनिर्माता संजय शिंगवी, कमलेश मेडिकलचे औषधनिर्माता नवीन कासवा, वर्धमान मेडिकलचे औषधनिर्माता संजय वर्धमाने,श्रीदत्त मेडिकलचे औषधनिर्माता वसीम पठाण ,ओम साई मेडिकलचे औषध निर्माता बिभीषण सोनटक्के, शृंगेरी मेडिकलचे औषधनिर्माता बाळू नाळे, श्रेयश मेडिकलचे औषधनिर्माता ज्योतीराम कोकणे भाग्यश्री मेडिकलचे औषध निर्माता श्रीराम डोंगरे, ग्रामीण रुग्णालय आष्टी येथील औषधनिर्माता संदीपण धस व इतर औषधनिर्मात्यांचा गौरव सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. औषध निर्माता संजय शिंगवी मेडिकल असोसिएशन तालुका अध्यक्ष आपल्या मनोगतामध्ये म्हणाले की औषध विक्री याच्याकडे व्यवसाय म्हणून न पाहता एक समाजसेवा म्हणून पहावे आणि जनतेची सेवा करावी अशी त्यांनी भावी औषधनिर्माता, विद्यार्थ्यांना यांना सांगितले.
त्यानंतर आष्टी मधील सर्व औषध निर्माता, कॉलेजचे प्राचार्य सर्व प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी मिळून औषधनिर्मातासाठी असलेली शपथ(ऑथ) एकत्र सर्वांनी घेऊन केक कापून सेलिब्रेशन केले. दुपारी डी व बी फार्मसीचे जवळजवळ 400 विद्यार्थीची मिळून आरोग्य विषयी जनजागृती रॅली आष्टी शहरांमध्ये काढण्यात आली त्यामध्ये विद्यार्थ्यांनी आरोग्य कसे जतन करावे ,आरोग्याची कशी काळजी घ्यायची, औषधे कशा पद्धतीने घ्यायचे त्यांचा वापर कसा करायचा याविषयी संदेश पोस्टर मार्फत घोषणा देऊन जनजागृती केली. तसेच दुपारी कॉलेजच्या परिसरामध्ये २५ नवीन झाडे लावण्यात आली. या कार्यक्रमाविषयी कॉलेजचे प्राचार्य डॉ.सुनील कोल्हे विचारले असता त्यांनी सांगितले की 25 सप्टेंबर जागतिक औषध निर्माता दिवस हा सर्व औषध निर्मात्यासाठी एक वाढदिवसासारखाच आहे तसेच सर्व औषध निर्मात्यांना आपले कर्तव्यची आठवण करून देणारा आहे. त्यामुळे आम्ही दरवर्षी याप्रमाणे उत्साहात हा दिवस साजरा करतो असे त्यांनी सांगितले. या कार्यक्रमांमध्ये बक्षीस मिळवलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे संस्थापक अध्यक्ष मा. भीमराव धोंडे साहेब ,संचालक अजय (दादा) धोंडे ,अभय ( राजे) धोंडे , सर्व प्रशासकीय अधिकारी डॉ. डी. बी राऊत , शिवदास विधाते, दत्तात्रय गिलचे, माऊली बोडके, शिवाजी वनवे, संजय शेंडे यांनी विजेत्यांचे अभिनंदन केले व जागतिक औषध निर्माता दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमामध्ये कॉलेजचे प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी यांनी भाग घेऊन सर्व कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडला.