तू काळी दिसतेल, तू पुरुषां सारखी दिसतेस अखेर नवऱ्याच्या टोमण्यांना कंटाळलेल्या बायकोनं आपल्या नवऱ्याला संपवलं

लोकशाहीच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423046406 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,


नवऱ्याच्या शब्दांना आणि त्रासाला कंटाळून त्याच्या बायकोनं टोकाचं पाऊल उचललं. खरंतर या महिलेला तिचा नवरा दररोज ‘काळी काळी’ म्हणायचा आणि तिला मारझोड करायचा, ज्यामुळे अखेर संतापलेल्या बायकोनं आपल्याच हातानं आपलं कुंकु पुसलं आणि आपल्या चार महिन्याच्या बाळाला पोरकं केलं.

नवरा बायको म्हटलं की प्रेम, रुसवे-फुगवे, भांडणं हे सगळं येणारच. खरंतर संसार म्हटलं की जोडीदाराला समजून घेणं, त्यांच्या चुकांना सांभाळून घेणं या सगळ्या गोष्टी येतात, म्हणून तर त्यांना संसाराचे दोन चाक म्हणतात.
कारण दोघांपैकी एकाशिवाय संसार पुढे जात नाही. त्यात भारतीय संस्कृतीमध्ये बहुतांश लोक एका पेक्षा जास्त लग्न करणं टाळतात, ज्यामुळे बहुतेकदा आपल्या जोडीदारासोबत जमवून घेण्याचा प्रयत्न करतात. परंतू सध्या एक असं प्रकर समोर आलं आहे, ज्यामध्ये नवऱ्याच्या शब्दांना आणि त्रासाला कंटाळून त्याच्या बायकोनं टोकाचं पाऊल उचललं. खरंतर या महिलेला तिचा नवरा दररोज ‘काळी काळी’ म्हणायचा आणि तिला मारझोड करायचा, ज्यामुळे अखेर संतापलेल्या बायकोनं आपल्याच हातानं आपलं कुंकु पुसलं आणि आपल्या चार महिन्याच्या बाळाला पोरकं केलं.
या महिलेचं नाव संगीता आहे आणि तिने अनंत सोनवानी नावाच्या व्यक्तीशी प्रेम विवाह केला, परंतू लग्नानंतर तिचा नवरा तिला तू काळी दिसतेल, तू पुरुषां सारखी दिसतेस असं म्हणू लागला. अखेर नवऱ्याच्या टोमण्यांना कंटाळलेल्या बायकोनं आपल्या नवऱ्याला संपवलं

ही घटना छत्तीसगडच्या दुर्गमधील अमलेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे. पतीच्या मृत्यूनंतर पोलिसांनी आरोपी पत्नीला अटक केली आहे. सुरुवातीला महिलेनं आपण काहीही केलं नाही असं सांगितलं.

मी जेव्हा सकाळी उठली तेव्हाच मला नवरा मृत अवस्थेत सापडला असं सांगितलं, परंतू बायकोवर संशय असल्यामुळे पोलिसांनी तिला धमकी देत, बोलतं केलं. न्यायालयात हजर केल्यानंतर महिलेला तिच्या चार महिन्यांच्या मुलीसह तुरुंगात पाठवण्यात आलं आहे. आरोपी बायकोने पोलिस चौकशीत सांगितले आहे की, लग्नानंतर नवरा मला रोज कुरूप म्हणायचा. तू पुरुषा सारखी दिसतोस.

तू किती काळी आहेस? कधी आरशात चेहरा बघत जा आणि नवऱ्याच्या या टोमण्याला कंटाळून बायकोने आपल्याच नवऱ्याला ठार केलं.