सहकार प्रतिष्ठाणच्या महाप्रसादाचा घेतला नऊ हजार भाविकांनी लाभ

बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क करा. संपर्क : 9226040506

सहकार प्रतिष्ठाणच्या महाप्रसादाचा घेतला नऊ हजार भाविकांनी लाभ
————————————————————
तीन दिवस चालतो महाप्रसादाचा कार्यक्रम
—————————————————
आष्टी : नवराञ उत्सव उद्यापासून सुरू होत असून,प्रत्येक गावातील तरूण मंडळ देवीची ज्योत आणण्यासाठी तुळजापूर,माहूरगड,मोहटादेवी,
राशीन यासह विविध ठिकाणाहून ज्योत आणली जाते.आष्टी शहरातून जे मंडळ ज्योत आणण्यासाठी जाते त्या मंडळाची चहा,पाणी,नाष्टाची सुविधा गेल्या अनेक वर्षापासून सहकार प्रतिष्ठीन सामाजिक संस्था च्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात येते.याही वर्षी दि.24 पासून 25 व 26 असे तीन दिवस महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.तीन दिवसात पाचशे मंडळ तर नऊ हजार भक्तांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला आहे.
गेल्या पाच वर्षापासून आष्टी शहरातील सहकार प्रतिष्ठाण च्यावतीने विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येतात.कोरोना काळात या प्रतिष्ठाणने सर्व शासकीय कार्यालयात सॅनिटायझर किट तसेच मास्क चे वाटप केले.आणि उन्ह्याळ्यात पक्षांना पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी म्हणून प्रत्येक झाडावर पाण्याचे डब्बे जवळपास दहा हजार झाडांवर बसविले आहेत.असे अनेक उपक्रम हे प्रतिष्ठाण राबवित आहे.तर आष्टी शहरातून ज्योत आणण्यासाठी जेवढे मंडळ जातात त्या सर्व मंडळांना चहा,पाणी,नाष्ट्याची सुविधा देण्यात येत आहे.शनिवार व रविवार या तीन दिवसात जवळपास पाचशे मंडळ येथून गेले असून,आठ ते नऊ हजार भक्तांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला आहे.

वर्ग मिञांनी एकञ येऊन केले प्रतिष्ठाण
——————————————————
सर्व सन 2004 चे दहावीचे वर्गमिञ एकञ येऊन हा उपक्रम राबवित आहे.कितीही काम असले तरी आपल्या परिने याठिकाणी दोन,तीन,तास काम करायचेच तसेच या महाप्रसाद वाटपासाठी जवळपास साठ ते सत्तर जणांची टिम कार्यरत आहे.
——————————————————————