आष्टी तहसील कार्यालयावर डॉ . बाबासाहेब आंबेडकर सोशल फोरमच्या वतीने आक्रोश मोर्चाचे आयोजन

लोकशाहीच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423046406 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,


आष्टी तहसील कार्यालयावर डॉ . बाबासाहेब आंबेडकर सोशल फोरमच्या वतीने आक्रोश मोर्चाचे आयोजन
आष्टी तालुक्यातील दलित- भटके- विमुक्त- भूमिहीन शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे — यशवंत खंडागळे
आष्टी/ बीड (  गोरख मोरे ) : आष्टी तहसील कार्यालयावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सोशल फोरमच्या वतीने दिनांक २६ सप्टेंबर २०२२ सोमवार रोजी ठीक दुपारी १ – वाजता शासकीय गायरान जमिनीवरील अतिक्रमण नियमित करणे व इतर मागण्यासाठी आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले असून या मोर्चात आष्टी तालुक्यातील दलित , भटके , विमुक्त , भूमिहीन , शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सोशल फोरम बीड जिल्हा अध्यक्ष तथा पंचायत समिती सदस्य श्री यशवंत खंडागळे यांनी केले आहे .
आष्टी तहसील वरील आक्रोश मोर्चा मधील प्रमुख मागण्या — आष्टी तालुक्यातील शासकीय गायरान जमिनी १९९० पूर्वीच अतिक्रमण तात्काळ नियमित करण्यात यावेत व शेततळे , फळबाग , जलसिंचन , विहिरी मंजूर करण्यात यावेत . श्रावण बाळ संजय गांधी निराधार योजनेतून येणाऱ्या मानधनात दुपटीने वाढ करण्यात यावी . रमाई शक्कर ठक्कर बप्पा घरकुल योजनेतून तात्काळ विनाट घरकुले मंजूर करण्यात यावे . अनु जाती , जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांना फळबाग , जलसिंचन विहिरी , शेततळे मंजूर करण्यात यावेत . प्रधानमंत्री आवास योजनेचा प्रपत्र ड चा सर्वे पुन्हा करण्यात यावा . विधवा , परितक्त्या , निराधार महिला भगिनींना घरकुल मंजूर करण्यात यावे . महात्मा फुले , अण्णाभाऊ साठे , वसंतराव नाईक महामंडळाचे लघु उद्योगाचे कर्ज प्रकरणे तात्काळ मंजूर करण्यात यावेत . या मागण्यांसाठी आष्टी तहसील कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढण्यात येणार असून या आक्रोश मोर्चामध्ये आष्टी तालुक्यातील सर्व दलित , भटके , विमुक्त , भूमिहीन , शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सोशल फोरम बीड जिल्हा अध्यक्ष तथा पंचायत समिती सदस्य श्री यशवंत खंडागळे यांनी केले आहे .