नवरात्र उत्सवाला सुरुवात,बीडमध्ये मन हेलावून टाकणारी घटना

लोकशाहीच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423046406 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,


बीड : नवरात्र उत्सवाला सुरुवात होत आहे. पण त्याआधीच बीडमध्ये मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. तुळजापूर येथून देवीची ज्योत घेवून गावी निघालेल्या दुचाकीवरील दोघांना अज्ञात वाहनाने धडक दिली यात दोघांचा जागीच मृत्यू झाला.

दोन तरुणांच्या मृत्यूमुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. बीड आष्टी तालुक्यातील सांगवी पाटण इथं ही घटना घडली. महेश भास्करराव भोसले, अमोल सुरेशराव खिलारे अशी मृतांची नावे आहेत. दरवर्षीप्रमाणे गावात नवरात्र उत्सवानिमित्त तुळजापूर वरून ज्योत आणण्याची प्रथा आहे.

यासाठी गावातील 50 तरुण भाविक तुळजापूर इथं शनिवारी सकाळी निघाले होते. यातील एका दुचाकीला रात्री येरमाळा येथे रात्री 9 वाजेच्या सुमारास येरमाळाजवळ अज्ञात वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिली. यात भोसले आणि खिलारे दोघांचा जागीच मृत्यू झाला. महेश भोसले हा आरोग्यसेवक तर अमोल खिलारे उपसरपंच होते.

दोन तरुणांच्या अपघाती निधनाने गावात हळहळ व्यक्त होत आहे.