बेबी केअर सेंटरला आग,धुरामुळे चिमुकल्यांची प्रकृती गंभीर

बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क करा. संपर्क : 9226040506

अमरावतीत बेबी केअर सेंटरला अचानक आग लागली होती. परिणामी धुरामुळे उपचारासाठी दाखल झालेल्या चिमुकल्यांची प्रकृती गंभीर बनली. जिल्हा महिला रुग्णालय येथील बेबी केअर सेंटर आहे.सेटरला अचानक आग लागल्यामुळे खळबळ उडाली होती. अग्निशामन दलाने दोन पाण्याचया बंबाच्या सहाय्याने ही आग विझवली आहे.

अमरावती : अमरावतीत बेबी केअर सेंटरला आग लागली.होती. परिणामी धुरामुळे उपचारासाठी दाखल झालेल्या चिमुकल्यांची प्रकृती गंभीर बनली. अमरावती जिल्हा महिला रुग्णालय येथील बेबी केअर सेंटर आहे. त्या सेटरला अचानक आग लागली होती. परिणामी घटनास्थळी मोठी खळबळ उडाली. सुदैवाने अग्निशामन दलाने दोन पाण्याचया बंबाच्या सहाय्याने ही आग विझवली. बालकांना सुरक्षितपणे हलवण्यात आले आहे. धुरामुळे काही बालकांची प्रकृती गंभीर आहे.

बेबी केअर सेंटरला आग
शॉर्टसर्किटमुळे आग लागली – अमरावती जिल्हा रुग्णालयातील बेबी केअर सेंटरमध्ये शॉर्टसर्किटमुळे आग लागली होती. या आगीमुळे बेबी केअर सेंटरमध्ये सर्वत्र धूर पसरला. या धुरामुळे काही बालकांची प्रकृती गंभीर बनली. त्यांच्यावर तातडीने उपचार केले जात आहेत. मात्र सुदैैवाने कोणतीही जिवीतहानी झालेली नाही.

काहींना खाजगी रुग्णालयात हलविले – धुरामुळे त्रास होत असलेल्या काही बालकांची प्रकृती गंभीर असून त्यांना शहरातील खाजगी रुग्णालयात करण्यात आले होते. तसेच दोन मुलांना डॉक्टर पंजाबराव कृती वैद्यकीय महाविद्यालयात हलविण्यात आले आहे