दोन महिने सोबत राहून आणि शारिरीक संबंध ठेवूनही त्याने तिच्यासोबत लग्न केले नाही

लोकशाहीच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423046406 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,


वाशिम : तुझ्याशी लग्न करतो, अशी बतावणी करून आरोपीने सलग दोन महिने शारिरीक संबंध ठेवले.
मात्र आता लग्नास नकार देत आहे. अशा पिडीत महिलेच्या तक्रारीवरून जिल्ह्यातील मानोरा पोलिसांनी आज २३ सप्टेंबर रोजी आरोपीवर गुन्हा दाखल केला. माहुली येथील पीडित महिलेने तक्रारीत नमूद केले आहे की, २००७ मध्ये त्यांचे लग्न श्रीकांत रेवा राठोड यांच्याशी झाले होते. दोन महिने संसार केल्यानंतर काही कारणास्तव न पटल्याने वडिलांच्या घरी परत आली. तेथे राहत असताना गावातीलच देवश्री उत्तम चव्हाण या दुधविक्रेत्याशी मैत्री झाली. त्याची पत्नी त्याला सोडून गेली होती. त्यामुळे त्याने माझ्याशी लग्न करण्याची बतावणी केली. मी देखील लग्नास होकार दिला होता.

यादरम्यान १२ जुलै २०२२ रोजी आम्ही दोघे पुणे येथे गेलो. तिथेच लग्न करून राहण्याचे ठरले. मात्र दोन महिने सोबत राहून आणि शारिरीक संबंध ठेवूनही त्याने माझ्याशी लग्न केले नाही. त्यामुळे पुणे येथून घरी परत येऊन पोलिसांत धाव घेतल्याचे तक्रारीत नमूद आहे. त्यावरून पोलिसांनी आरोपी देवश्री चव्हाण याच्यावर भादंविचे कलम ३७६ (२) एन., ४१७, ३२४ अन्वये गुन्हा दाखल केला. पुढील तपास ठाणेदार शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.