गद्दार कोण आणि खुद्दार कोण हे जनतेला माहिती आहे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

लोकशाहीच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423046406 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,


मुख्यमंत्री शिंदे बोलताना म्हणाले की, आम्हाला गद्दार म्हणतात, आम्ही शिवसेना भाजपच्या युतीला हिंदुत्वाच्या विचारांना पुढे नेले, सत्तेसाठी आंधळे होऊन हे सगळ्यासोबत गद्दारी केली मग गद्दार कोण हा विचार करण्याचा भागा आहे. गद्दार कोण आणि खुद्दार कोण हे जनतेला माहिती आहे असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

नवी दिल्ली : मुंबईतील नेस्को सभागृहात आज शिवसेनेचा मेळावा झाला या मेळाव्यात उध्दव ठाकरे यांनी शिंदे गटातील बंडखोर आमदार आणि भाजपवर कडाडून टीका केली. यादरम्यान राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्लीतील महराष्ट्र सदन येथे झालेल्या कार्यक्रमातून शिवसैनिकांना चांगले दिवस आले ही आनंदाची गोष्ट आहे अशा शब्दात शिवसनेच्या गटप्रमुखांच्या मेळाव्याबाबत प्रतिक्रिया दिली आहे.
एकनाथ शिंदे म्हणाले की, कार्यकर्त्यांचे चांगले दिवस आलेत, मुंबईत गटप्रमुखांचा मेळावा सुरू आहे. मागच्या अडीच वर्षात गटप्रमुखांची आठवण आली नाही. अडीच वर्षात त्यांना काडीची किंमत दिली नाही, वर्षावर प्रवेश नव्हता. आम्ही उठाव करुन क्रांती केली त्यामुळं गटप्रमुख, शिवसैनिकांना चांगले दिवस आले ही आनंदाची गोष्ट आहे असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.