पाकिस्तानची अर्थव्यवस्था आधीच अतिशय बिकट स्थितीत आहे. त्यात पुराने भर टाकली असून परिस्थिती आणखी गंभीर झाली आहे.
रोख चलनाची भीषण टंचाई भेडसावत असलेला पाकिस्तान गेल्या 30 वर्षांतील अभूतपूर्व पुराचा सामना देखील करत आहे. यंदाच्या जून महिन्यापासून सुरू झालेल्या या पुरामुळे 1400हून अधिक नागरिक मृत्युमुखी पडले आहेत. तर सुमारे 3.3 कोटी नागरिक या पुराने बाधित झाले आहेत. पुरामुळे पाकिस्तानची अर्थव्यवस्था आणखी गाळात रुतली आहे.
पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी पाकिस्तानच्या गंभीर अर्थव्यवस्थेचं चित्र स्पष्ट केलं आहे. आता मित्र देशही पाकिस्ताना भिकारी समजायला लागले आहेत. त्यांच्या नजरेत पाकिस्तान असा देश झाला आहे, जो सतत भीक मागत असतो, अशी स्पष्टोक्ती शरीफ यांनी केली आहे.
पंतप्रधान शरीफ यांनी बुधवारी पाकिस्तानमध्ये झालेल्या एका वकिलांच्या संमेलनाला संबोधित केलं. या संबंधीचं वृत्त डॉन या वृत्तपत्राने दिलं आहे. या संमेलनात शरीफ म्हणाले की, आज जेव्हा आम्ही कुठल्या देशाला विशेषतः मित्र देशाला फोन करतो, तेव्हा त्यांना वाटतं की, आम्ही त्यांच्याकडे पैसे मागायला फोन केला आहे. पाकिस्तानची अर्थव्यवस्था आधीच अतिशय बिकट स्थितीत आहे. त्यात पुराने भर टाकली असून परिस्थिती आणखी गंभीर झाली आहे.
रोख चलनाची भीषण टंचाई भेडसावत असलेला पाकिस्तान गेल्या 30 वर्षांतील अभूतपूर्व पुराचा सामना देखील करत आहे. यंदाच्या जून महिन्यापासून सुरू झालेल्या या पुरामुळे 1400हून अधिक नागरिक मृत्युमुखी पडले आहेत. तर सुमारे 3.3 कोटी नागरिक या पुराने बाधित झाले आहेत. पुरामुळे पाकिस्तानची अर्थव्यवस्था आणखी गाळात रुतली आहे.
पाकिस्तानच्या एक-तृतीयांश भाग पूरग्रस्त झाला आहे. यात 2.1 कोटी एकर शेतजमिनीचाही समावेश असल्याने 12 अब्ज डॉलर्सचं नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. अद्यापही अनेक प्रांतात नागरिक तात्पुरत्या स्वरुपातील शिबिरांमध्ये राहत आहेत.