बीडः बीड जिल्ह्यातील 11 तालुक्यातील मुस्लिम महिलांनी आज आंदोलन केलं. बिल्किस बानो (Bilkis Bano) प्रकरणातील आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, या मागणीसाठी शेकडो महिलांनी ( Muslim Women ) मूक मोर्चा ( Beed Morcha ) काढला.
बिल्कीस बानो यांच्यावर अन्याय करणा-यांना अटक करा. मौलाना कलिम सिद्दीकी यांची सुटका करा अशा मागण्या करत बीड येथे मुस्लिम महिलांनी माेर्चा ( morcha) काढला.
हा माेर्चा बीड शहरातील किल्ला मैदान येथून सुुरु झाला. कारंजा रोड- छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहचला. त्या ठिकाणीं पाच विद्यार्थिनींनी मोर्चाला संबोधित केले. यावेळी हा देश गंगा जमना तहजीबने चालतो हा देश सर्व धर्मांचा आहे एक धर्माचा नाही. देश म्हणून एकत्र येऊ या बेरोजगारी कमी करू या. तसेच बिल्कीस बानो प्रकरणात आरोपींना कठोर शिक्षा व्हावी आशी मागणी यावेळी केली.
दरम्यान या माेर्चात कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून पोलिसांनी करडी नजर ठेवली होती. बीड जिल्हा पोलीस प्रशासनाने देखील तगडा बंदोबस्त ठेवला होता. या मोर्चांमध्ये प्रामुख्याने बिल्कीस बानो प्रकरणात संशयित आरोपींना मोकाट सोडण्याच्या घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला. मुस्लिम धर्मगुरु वरील वारंवार होणाऱ्या बदनामीकारक वक्तव्याचा निषेध केला. संविधान बचाव संदर्भात या प्रमुख मागण्याचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले.