मुले पळवणारी चोरांची टोळी समजून चौघा साधूंना बेदम मारहाण

बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क करा. संपर्क : 9226040506

मुले पळवणारी चोरांची टोळी समजून चौघा साधूंना बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जत तालुक्यातल्या लवंगा या ठिकाणी हा प्रकार घडला आहे. उत्तर प्रदेश मधून लवंगा या ठिकाणी आलेल्या चौघा साधूंना चोर समजून ग्रामस्थांनी मारहाण केल्याचा प्रकार घडला आहे.

या घटनेची नोंद उमदी पोलीस ठाण्यामध्ये झाली आहे.

जत तालुक्यातल्या उमदी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लवंगा येथे चौघा साधून बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. उत्तर प्रदेश मधील मथुरा येथील चौघे साधू हे कर्नाटक या ठिकाणी देवदर्शनासाठी आले होते, त्यानंतर ते विजापूरहून जत तालुक्यातल्या लवंगा मार्गे पंढरपूर या ठिकाणी देवदर्शनासाठी निघाले होते. यावेळी लवंगा या चौघा साधूंनी रात्रीच्या सुमारास गावातल्या एका मंदिरामध्ये मुक्कामा केला होता, त्यानंतर सकाळी हे चौघेही साधू गाडीतून निघाले असता, एका मुलाला त्यांनी रस्ता विचारला, त्यातून काही ग्रामस्थांना ही मुले चोरणारी टोळी असल्याचा संशया आला. यानंतर ग्रामस्थांनी या साधूंकडे चौकशी करायला सुरुवात केल्यानंतर साधू आणि ग्रामस्थांच्या मध्ये वादावादीचा प्रकार घडला, यातून संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी साधूंना गाडीतून बाहेर काढून बेदम मारहाण केली.

लाठी-काठी आणि पट्टयाने जबर मारहाण यावेळी करण्यात आली. या घटनेची माहिती मिळताच उमदी पोलिसांनी घटनास्थळी तातडीने धाव घेतली होती. त्यानंतर या साधूंकडे चौकशी केली असता, या साधूंच्याकडे मिळालेले आधार कार्ड आणि त्यानंतर संबंधित उत्तर प्रदेश मधील त्यांच्या नातेवाईकांकडे चौकशी केली असता, हे सर्व मथुरा येथील श्री पंचनामा जुना आखडयाचे साधू असल्याचं समोर आलं आणि ते खरे साधू असल्याचे स्पष्ट झाले.

त्यानंतर या साधूंनी मोठ्या मनाने ग्रामस्थांच्या विरोधात कोणतेही तक्रार नसून गैरसमजुरीतून हा प्रकार घडल्याचं पोलिसांना सांगितलं, त्यामुळे या प्रकरणी कोणाची ही तक्रार पोलीस ठाण्यात दाखल झाली नाही, अशी माहिती उमदी पोलीस ठाण्याचे अधिकारी पंकज पवार यांनी सांगितले आहे. तर चौकशीनंतर साधूंनी पंढरपूरकडे देवदर्शनासाठी प्रस्थान केले. मात्र या मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. तर काही वर्षांपूर्वी पालघर या ठिकाणी साधूंना, अशाच प्रकारे चोर समजून मारहाण केल्याने हत्येचा प्रकार घडला होता, तशीच पुनरावृत्ती सुदैवाने लवंगा येथे होता-होता टळली आहे.