पोलिस स्टेशनमध्ये गोंधळ घालणं नवनीत राणांच्या अंगलट

बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क करा. संपर्क : 9226040506

मुंबई : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी अमरावतीतील कथित लव्ह जिहाद प्रकरणी पोलिस स्टेशनमध्ये जात आक्रमक भूमिका घेतली होती. लव्ह जिहाद झाल्याचा आरोप करत नवनीत राणांनी पोलिस स्टेशनमध्ये जोरदार गोंधळ घातला.

मात्र, आता पोलिस स्टेशनमध्ये गोंधळ घालणं नवनीत राणांच्या अंगलट आलं आहे. सर्वांची माफि माग नाहीतर तुला सोडणार नाही, असा इशारा एका पोलिसाच्या पत्नीने दिल्याने एकच खळबळ उडाली आहे.

पोलिसांबद्दल तू नेहमीच अपशब्द वापरतेस. आता मात्र तुला त्यांची माफि मागावी लागेल. अन्यथा तुला सोडणार नाही, असा इशारा पोलिस पत्नी आणि शिवसेना पदाधिकारी वर्षा भोयर यांनी नवनीत राणांना दिला आहे.

दरम्यान, नवनीत राणांनी पोलिसांशी हुज्जत घालत कॅमेऱ्यासमोर प्रसिद्धीसाठी स्टंटबाजी केल्याचा आरोप केला जात आहे. या प्रकरणावरून आता पोलिसांचे कुटुंबीय मात्र आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत.