वैभव क्षीरसागर यांना मातृशोक; राजुरी येथे उद्या सकाळी 10 वाजता अंत्यसंस्कार

लोकशाहीच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423046406 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,


बीड : संतोषीमाता चित्रमंदिराचे मालक वैभव क्षीरसागर यांच्या मातोश्री सौ. वनमाला सुरेश क्षीरसागर यांचे आज सकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पार्थीवदेहावर नवगण राजुरी फाटा येथील शेतामध्ये 11 सप्टेंबर वार रविवार सकाळी 10 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

संतोषीमाता चित्रमंदिराचे मालक वैभव क्षीरसागर यांच्या मातोश्री सौ. वनमाला सुरेश क्षीरसागर या गेल्या काही दिवसांपासून आजारी होत्या. पुणे येथील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. आज सकाळी 11 वाजता उपचार घेत असताना सौ.वनमाला क्षीरसागर यांचे निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय 73 वर्षे होते. त्यांच्या पार्थीवदेहावर नवगण राजुरी फाटा येथील क्षीरसागर यांच्या शेतात उद्या दि. 11 सप्टेंबर वार रविवार रोजी सकाळी 10 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. क्षीरसागर कुटुंबियावर कोसळलेल्या दु:खात लोकशाही न्युज परिवार सहभागी आहे.