अकरावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीने शाळेत दीला बाळाला जन्म….

लोकशाहीच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423046406 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,


संबंधित प्रकाराबाबत तसेच मुलीच्या गर्भधारनेबाबत कुणालाही माहिती नसल्याची कबुली मुलीने पोलिसांना दिली. पोलिसांनी तिच्या कुटुंबिय, नातेवाईक, गावकरी आणि काही संशयितांना ताब्यात घेतले आहे. याबाबत पोलिस पुढील तपास करत आहेत.

चेन्नई : अकरावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीने शाळेत बाळाला जन्म दिल्याची धक्कादायक घटना कुड्डालोर गावातील उघडकीस आली आहे. याघटनेनंतर एकच खळबळ उडाली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास करत आहेत.
सरकारी शाळेच्या शौचालयाजवळ शाळा प्रशासनाला एका बाळाचा मृतदेह आढळला होता. संबंधित घटनेची माहिती शाळा प्रशासनाने पोलिसांना दिली. पोलिसांना तपास केला असता ते अर्भक शाळेतील अकराव्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थिनीचे असल्याची माहिती मिळाली आहे. संबंधित 16 वर्षीय मुलीला पोलिसांनी मुलीला रुग्णालयात दाखल केले असून तिला गर्भधारणा करणाऱ्या व्यक्तीचा तपास करीत आहेत.
विद्यार्थिनीला शाळेत शिकवणी सुरु असाताना तिला अचानक प्रसूतीचा त्रास जाणवू लागला आणि ती ताबडतोब शौचालयात गेली. शौचालयात गेल्यानंतर तिने तिथे बाळाला जन्म दिला. दरम्यान ते अर्भक जिवंत होते. पेनच्या साहाय्याने तिने बाळाची नाळ कापली आणि या सगळ्या प्रकारानंतर ती पुन्हा वर्गात आली, अशी धक्कादायक माहिती या पिडीत मुलीने पोलिसांना दिली. पण पोलिसांच्या माहितीनुसार प्रसुती दरम्यान तिच्या बरोबर कुणी नसल्याने हे अर्भक जिवंत नसल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.