घरात ती एकटी असल्याची संधी साधून शारीरिक अत्याचार

लोकशाहीच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423046406 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,


नाशिक शहरात दररोज महिला अत्याचाराच्या एक किंवा दोन घटना घटना उघडकीस येत आहेत. यामध्ये विनयभंग, अत्याचार, मारहाणीच्या घटना घडत आहेत. एकीकडे महिला सक्षमी करणासाठी सरकार वेगवगेळ्या उपाययोजना राबवित असताना महिला, मुलींवर अत्याचार काही थांबायचे नाव घेत नाही. नाशिक शहर परिसरात कुठे न कुठे महिला अत्याचाराची घटना उघडकीस येत आहे. यावर पोलीसही कारवाई करीत आहेत. मात्र तरीदेखील पोलिसांना न जुमानता अत्याचारांच्या घटनांत वाढ सुरूच आहे.

अंबड पोलीस ठाण्याच्या (Ambad Police Station) हद्दीत एका भागात घराशेजारी राहणाऱ्या संशयिताने अल्पवयीन मुलीवर शारीरिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना अवघडती झाली आहे. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात पीडीतेच्या पालकांनी दिलेल्या तक्रारीवरून पोस्को (POSCO) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सिडको (Cidco) परिसरातील अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील राहणारे कुटुंब पीडीतेचे कुटुंब पालक रोजंदारी कामासाठी घराबाहेर पडले होते. घरातील भावंड होते. यावेळी संशोध राजेश हा रविवारी त्यांच्या घरात दुपारच्या सुमारास बळजबरीने गेला. यावेळी पीडितेचे भावंड बाहेर खेळण्यासाठी निघून गेले असता त्याने घरात ती एकटी असल्याची संधी साधून शारीरिक अत्याचार केले. मुलीने आरडाओरड सुरू करताच त्याने घरातून बाहेर पळ काढला असे फिर्यादीत म्हटले आहे. पीडितेने हा सगळा प्रकार संध्याकाळी आई-वडिलांना सांगितला. त्यांनी संशयिताचा आजूबाजूला शोध घेण्याचा प्रयत्न केला मात्र तो आढळून आला नाही. दरम्यान पीडित मोर्चा वडिलांना पोलीस ठाणे गाठून घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला.