अवघ्या ३ दिवसांत ६ हजार लोकांची हत्या, ‘या’ देशात भीषण नरसंहार, संयुक्त राष्ट्रांच्या रिपोर्टमधून धक्कादायक माहिती ….

आफ्रिका खंडातील सर्वाधिक अशांत देशांपैकी एक असलेल्य सुदानमध्ये अवघ्या ३ दिवसांत सहा हजार लोकांची हत्ा झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार कार्यालयाच्या नव्या अहवालामधून ही माहिती समोर आली आहे.
या अहवालामधील उल्लेखानुसार ऑक्टोबर महिन्यातील शेवटच्या आठवड्यात दार्फुर क्षेत्रातील अल-फाशेर शहरात झालेल्या या भीषण हल्ल्यात मोठ्या प्रमाणावर रक्तपात झाला होता. ही माहिती साक्षीदारांच्या जबाबाच्या आधारावर देण्यात आली आहे.
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार सुदानमध्ये एप्रिल २०२३पासून लष्कर आणि निमलष्करी दलामध्ये संघर्ष सुरू आहे. एल-फाशेर दार्फुरमध्ये सैन्याचा शेवटचा मोठा तळ होता. १८ महिने चाललेल्या वेढ्यानंतर आऱएसएफने २६ ऑक्टोबर रोजी शहरावर मोठा हल्ला केला. संयुक्त राष्ट्रांच्या रिपो्टनुसार २५ ते २७ ऑक्टोबरदरम्यान, किमान ४ हजार ४०० लोक शहरामध्ये मारले गेले. तर सुमारे १६०० लोक हे जीव वाचवून पळण्याच्या प्रयत्नात असताना मारले गेले. म्हणजेच या तीन दिवसांमध्ये मरणाऱ्यांची संख्या सहा हजार एवढी झाली.
या अहवालातील माहितीनुसार हल्ल्यादरम्यान, मोठ्या प्रमाणावर गोळीबार, घरात घुसून हत्या, महिलांसोबत लैंगिक हिंसाचार, मुलांसह लोकांचं अपहरण करणे, यातना देणे आणि कुठल्याही सुनावणीशिवाय मृत्युदंड देणं यासारख्या कृत्यांचा समावेश होता. यामधील अनेक हल्ले हे वांशिक ओळखीच्या आधारावर करण्यात आले. यातील एका घटनेत सुमारे एक हजार लोकांनी एका युनिव्हर्सिटीच्या हॉस्टेलमध्ये आश्रय घेतला होता. तिथे विध्वसंक हत्यारांद्वारे करण्यात आलेल्या हल्ल्यात ५०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला. तर अन्य एका ठिकाणी सुमारे सुमारे ६०० लोकांना एका जागी गोळा करून मारण्यात आले.
दरम्यान, या हत्याकांडामधील मृतांचा आकडा हा आणखी वाढू शकतो, अशी भीती संयुक्त राष्ट्रांनी व्यक्त केली आहे. तसेच गेला काही काळापासून सुरू असलेल्या या संघर्षाने सुदानला जगातील सर्वात मोठ्या मानवी संकटाच्या खाईल लोटले आहे, असेही संयुक्त राष्ट्रांनी म्हटले आहे.











