ताज्या बातम्यादेश-विदेशमहत्वाचे

मुख्यमंत्री थोडक्यात बचावले, उड्डाण घेताच मागे जाऊ लागलं हेलिकॉप्टर, मोठी दुर्घटना टळली!


मध्य प्रदेशातील खंडवा जिल्ह्यात एक धक्कादायक प्रसंग घडला. मुख्यमंत्री मोहन यादव यांच्या हेलिकॉप्टरच्या उड्डाणावेळी काही क्षणांसाठी उपस्थितांची धडधड वाढली.

पंधाना येथे आयोजित कार्यक्रमानंतर हेलिकॉप्टरने टेकऑफ घेतल्यानंतर ते पुढे जाण्याऐवजी अचानक मागे जाऊ लागल्याचे दिसून आले. हा प्रकार पाहून चांगलीच खळबळ उडाली. मात्र पायलटने प्रसंगावधान राखत हेलिकॉप्टरवर नियंत्रण मिळवलं आणि मोठी दुर्घटना टळली.

मुख्यमंत्री मोहन यादव हे खंडवा जिल्ह्यातील पंधाना येथे लाडली बहना योजना च्या कार्यक्रमासाठी आले होते. त्यांनी या योजनेचा ३३वा हप्ता वितरित केला. महाशिवरात्रीपूर्वी राज्यातील महिलांना १,५०० रुपयांची आर्थिक मदत देण्यात येत असल्याचे त्यांनी जाहीर केले. महिलांच्या सक्षमीकरणासाठी राज्य सरकार कटिबद्ध असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

मध्यप्रदेशच्या मुख्यमंत्री कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, यावेळी एकूण १.२५ कोटींहून अधिक लाभार्थ्यांच्या खात्यात एकूण १,८३६ कोटी रुपये वर्ग करण्यात आले. या योजनेअंतर्गत आतापर्यंत ५२,३०४ कोटी रुपयांचे वितरण झाले आहे. महिलांना स्वयं-सहाय्यता गटांशी जोडून त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यावर सरकारचा भर असल्याचही यावेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

दरम्यान, हा कार्यक्रम झाल्यानंतर ते नियोजित दौऱ्यासाठी निघाले. मात्र, त्यांच्या हेलिकॉप्टरने उड्डाण घेताच, ते अचानक डगमगू लागलं. हेलिकॉप्टर पुढे न जाता अचानक मागे जाऊ लागल्याने सगळ्यांचीच धाकधाकू वाढली. पण काही मिनिटांतच पायलटने हेलिकॉप्टरवर नियंत्रण मिळवत परिस्थिती नियंत्रणात आणली. या प्रकरणाची आता दखल घेण्यात आली असून तपास करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button