नवी दिल्लीत व्लादिमिर पुतिन यांचे ग्रँड वेलकम, पंतप्रधान मोदी यांनी आलिंगन देत केले जोरदार स्वागत…

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन भारताच्या दोन दिवसांच्या दौऱ्यासाठी अखेर आज सायंकाळी नवी दिल्ली विमानतळावर दाखल झाले आहेत. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे आलिंगन देऊन जोरदार स्वागत केले आहे.
रशियाचे अधिकारी झाले चकीत
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ज्या प्रकारे प्रोटोकॉल तोडून राष्ट्राध्यक्ष पुतिनयांचे स्वागत केले त्यामुळे रशियाचे अधिकारी देखील चकीत झाले आहेत. रशियाने जारी केलेल्या निवदेनात म्हटले आहे की आम्हाला माहिती नव्हते मोदी स्वत: विमानतळावर उपस्थित राहतील.
पुतीन यांचा दौरा का महत्त्वाचा आहे?
दोन्ही देशांमध्ये क्रूड ऑईल खरेदी करार, संरक्षण आणि मुक्त व्यापार करार (एफटीए) यासह विविध विषयांवर चर्चा होण्याची शक्यता आहे.पुतिन यांच्या या दौऱ्यात दोन्ही देशात कोणते संरक्षण आणि व्यापारी करार होणार याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. रशियाची Su-57 लढाऊ विमाने आणि सध्याची एस-४०० मिसाईल डिफेन्स सिस्टीम, भविष्यातील S-५०० मिसाईल डिफेन्स सिस्टीम आणि ब्रह्मोस क्षेपणास्त्राची पुढील आवृत्ती आणि दोन्ही देशांच्या नौदलांसाठी एकत्रितपणे संरक्षण साहित्या आणि युद्धनौका तयार करण्यासारख्या योजनांवर चर्चा होण्याची शक्यता आहे.











