क्राईमताज्या बातम्यादेश-विदेशपुणेमहत्वाचेमहाराष्ट्र

सोलापूरात शिक्षण, पुण्यात 15 वर्षे नोकरी, संशयित दहशतवादी झुबेर हंगरगेकर नेमका आहे तरी कोण?


दहशतवाद हे भारतासमोरील सर्वात मोठ्या आव्हानांपैकी एक आहे. काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र एटीएसने संशयित दहशतवादी जुबेर हंगरगेकरला अटक केली होती. त्याच्यावर अल कायदा इन इंडियन सबकाँटिनेन्ट (एक्यूआयएस) या दहशतवादी संघटनेच्या समर्थनार्थ जिहादचा प्रसार आणि प्रचार करण्याचा आरोप आहे.

 

सध्या त्याची तपास यंत्रणांकडून कसून चौकशी सुरू आहे. अशातच आता हा जुबेर हंगरगेकर कोण आहे? तो काय काम करतो याबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

सोलापूरात शिक्षण, पुण्यात नोकरी

झुबेर हंगरगेकर हा सॉफ्टवेअर इंजिनिअर असून त्याने गेल्या 15 वर्षांपासून पुण्यातील हिंजवडी आणि कल्याणीनगर येथील नामांकित आयटी कंपन्यांमध्ये नोकरी केलेली आहे. झुबेरने सोलापूर सोशल असोसिएशन उर्दू हायस्कूलमध्ये शिक्षण घेतले, त्यानंतर त्याने सोलापूरच्या वालचंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून बी.ई पदवी घेतली आहे. मात्र आता तो एका दहशतवादी संघटनेसाठी काम करत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

 

10 वर्षांपासून दहशतवाद्यांच्या संपर्कात

समोर आलेल्या माहितीनुसार झुबेर 2015 मध्ये दहशतवादाशी संबंधित व्यक्तीच्या संपर्कात आला, त्याने अतिरेकी धर्मोपदेशकांकडून मिळणारे कट्टरपंथी साहित्य वाचण्यास सुरुवात केली. आयईडी बनवणे, एकटे हल्ले करणे आणि गनिमी कारवाया करणे यावरील पुस्तकांचा हंगरगेकरने अभ्यास केला. कालांतराने तो गनिमी युद्ध, विविध प्रकारचे आयईडी तयार करण्यात पारंगत बनला.

 

जिहादसाठी तरुणांना मार्गदर्शन

जुबेर हंगरगेकर आंतरराष्ट्रीय टेलिग्राम गटांसह अनेक टेलिग्राम ग्रृपचा सदस्य आहे, हे ग्रृप अतिरेकी सामग्री प्रसारित करतात. अनेक तरुणांना त्याने ‘जिहाद करण्याचे मार्ग’ यावर व्याख्यान दिले आहे. जिहाद हाच भारतात खिलाफत आणण्याचा आणि शरियत शासन स्थापित करण्याचा एकमेव मार्ग आहे असं त्याने तरूणांच्या मनावर कोरण्याचा प्रयत्न केला. तसेच लोकशाही शरियतच्या विरोधात असल्याचा उपदेश त्याने अनेकांना दिला आहे.

 

सध्या तपास यंत्रणा झुबेरची कसून चौकशी करत असून तो किती तरुणांच्या संपर्कात आला? त्याने कुठे हल्ला करण्याची योजना आखली होती? त्याच्यासोबत आणखी कोण-कोण या गुन्ह्यात सहभागी आहे? याचा तपास केला जात आहे. तसेच तो आतापर्यंत कोणत्या दहशतवाद्यांच्या संपर्कात आला याचाही शोध घेतला जात आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button