क्राईम

अनैतिक संबंधाला दोन मुलांची आई चटावलेली, तरुण मुलाच्या नादात बसली नको ते करून अन …


प्रेमात पडलेली व्यक्ती काहीही करू शकते, मुझफ्फरनगरमध्येही असेच काही घडले, येथे दोन मुलांच्या आईने प्रेमाच्या नावाखाली स्वतःच्या मुलांसोबत असे काही केले की, ज्यामुळे सर्व जण हादरून गेले आहेत.

प्रकरण मुझफ्फरनगरच्या रुडकाली गावाचे आहे. येथे राहणाऱ्या मुस्कानचे लग्न 7 वर्षांपूर्वी रुडकाली येथील रहिवासी वसीमशी झाले होते. गेल्या दोन वर्षांपासून वसीम हा टीबीने ग्रस्त होता आणि शारीरिकदृष्ट्या कमकुवत असल्याने तो मुस्कानच्या इच्छा पूर्ण करू शकत नव्हता. याच काळात, जुनैद नावाचा एक तरुण मुस्कानच्या आयुष्यात आला, जो तिचा जवळचा नातेवाईक होता. दोघांमध्ये जवळीक वाढली आणि ते प्रेमात पडले.

 

वसीम अनेकदा उपचार आणि कामासाठी चंदीगडला जात असे, ज्याचा फायदा घेत मुस्कान जुनैदला घरी बोलावत असे. त्या दरम्यान, त्यांच्यात अनैतिक शारीरिक संबंध देखील प्रस्थापित झाले होते.

प्रियकर मुलांचा खर्च उचलू शकत नव्हता, म्हणून…

मुस्कान आणि जुनैदची यांच्या नात्यात मुस्कानची मुलं अरहान आणि इनाय हे अडथळा ठरत होते. अनैतिक संबंध प्रस्थापित झाल्यानंतर मुस्कानने जुनैदशी लग्न करण्याचा आणि त्याच्यासोबत राहण्याचा आग्रह धरलेला. यावेळी जुनैद तिला म्हणाला की, तो मुस्कानचा खर्च उचलू शकतो, पण तिचा मुलांचा नाही.

 

ज्यानंतर दोघांनी मिळून एक भयानक कट रचला. जुनैदने मुस्कानला एक जहरी विष आणून दिलं. ज्यानंतर 19 जून रोजी सकाळी मुस्कानने चहामध्ये ते विष मिसळलं तोच चहा तिने तिच्या दोन्ही मुलांना पाजला. त्यानंतर दोन्ही मुले मरण पावली.

पोलिसही झाले थक्क

शुक्रवारी दुपारी पोलिसांना दोन मुलांच्या मृत्यूची माहिती मिळाली. पोलीस घटनास्थळी पोहोचले तेव्हा तेथील दृश्य पाहून ते देखील थक्क झाले. 5 वर्षांचा अरहान आणि 1 वर्षाचा इनाया हे त्यांना मृतावस्थेत आढळून आले. मुलांचे वडील वसीम कामासाठी चंदीगडला गेले होते आणि फक्त मुलांची आई मुस्कान घरी होती.

 

तपासात मुलांच्या शरीरावर कोणत्याही जखमा किंवा जखमेच्या खुणा आढळल्या नाहीत. चौकशीदरम्यान मुस्कानने सांगितले की तिने सकाळी नाश्त्यासाठी मुलांना चहा आणि बिस्किटे दिली होती. पोलिसांना प्रकरण संशयास्पद वाटले आणि मुलांचे मृतदेह त्यांनी शवविच्छेदनासाठी पाठवले.

 

शवविच्छेदन अहवालात विषबाधेमुळे मुलांचा मृत्यू झाल्याचे धक्कादायक सत्य उघड झाले. त्यानंतर पोलिसांनी मुस्कानची कठोर चौकशी केली आणि तिने आपला गुन्हा कबूल केला. पोलिसांनी मुस्कानला अटक केली आणि या दुहेरी हत्याकांडाचे रहस्य उलगडलं. चौकशीदरम्यान तिने संपूर्ण कट उघड केला. तथापि, जुनैद अजूनही फरार आहे आणि पोलीस त्याच्या शोधात छापे टाकत आहेत.

 


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button