क्राईम

होणाऱ्या सुनेसोबत पळून जाऊन सासऱ्यानं केलं लग्न, प्रेमात पडताना वास्तवाचं भान विसरलं की असं काही घडतं ….


प्रेमात पडलं की साऱ्या जगाचा विसर पडतो. प्रेमात पडणाऱ्या व्यक्तींनी एकमेकांशिवाय काही सूचत नाही, असं म्हणतात. प्रेम ही अगदी सहज आणि कुणालाही होऊ शकेल अशी सुंदर संकल्पना आहे. पण, प्रेमात पडताना वास्तवाचं भान विसरलं की असं काही घडतं की ज्यामुळे त्या व्यक्तीसह अनेकांच्या आयुष्याला धक्का बसतो.

कुटुंबीयांनी तर कल्पनाही केली नसेल अशा गोष्टी प्रेमात आंधळ्या झालेल्या व्यक्तींमुळे त्यांना सहन कराव्या लागतात.

प्रेयसीला करणार होता सून

शकील नावाच्या एका व्यक्तीनं हेच केलं. त्यानं त्याच्या प्रेयसीलाच सून करण्याचं ठरवलं होतं. स्वत:चे प्रेमसंबंध लपून राहतील आणि कुटुंबातील कुणालाही संशय येणार नाही, असा त्याचा उद्देश होता. त्यासाठी शकीलनं त्याच्या अल्पवयीन मुलाचं लग्न प्रेयसीशी करण्याचं ठरवलं होतं. कुटुंबाने या नात्याला विरोध केला, तेव्हा त्याने त्यांना मारहाण केली.

 

शकीलचे होणाऱ्या सुनेसोबत प्रेमसंबंध आहेत, असा त्याच्या पत्नीला संशय होता. तिने आपल्या नातेवाईकांनाही हे सांगितले, पण कुटुंबातील कुणाचाही त्यावर विश्वास बसला नाही. मात्र, शकीलच्या मुलाने त्याच्या वडिलांच्या कृत्याचे पुरावे गोळा केले आणि कुटुंबासमोर मांडले. आपण उघडे पडलो हे लक्षात येताच शकीलनं जे केलं त्याची कल्पना कदाचित कुणीही केली नसेल. उत्तर प्रदेशातील रामपूरमधील ही धक्कादायक घटना आहे.

 

काय आहे प्रकरण?

रामपूरच्या बांसनगली गावातील रहिवासी शकीलने त्याच्या अल्पवयीन मुलाचे लग्न 18 वर्षांच्या मुलीशी ठरवले होते. शकीलच्या पत्नीचा या लग्नाला विरोध होता. त्यावेळी शकीलनं पत्नी आणि मुलाला मारहाण केली. त्यांच्यावर दबाव टाकला आणि मुलीसोबत नाते जोडले.

 

ही गोष्ट इथेच संपली नाही, अल्पवयीन मुलासोबत जबरदस्तीने नाते निश्चित केल्यानंतर शकील आपल्या होणाऱ्या सुनेसोबत मोबाईलवर दिवस-रात्र बोलू लागला. ते अनेकदा व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून एकमेकांशी बोलत असत. शकीलच्या कुटुंबीयांनी याचा विरोध केला, पण शकीलने कुणाचेही ऐकले नाही. त्याने कुटुंबीयांना पुन्हा मारहाण केली.

 

प्रेयसीसोबत पलायन आणि

वडिलांचे प्रेमप्रकरण कळल्यानंतर मुलाने निकाह करण्यास नकार दिला. अशा परिस्थितीत शकील घरात ठेवलेले पैसे आणि सोने घेऊन पळून गेला . त्याने होणाऱ्या सुनेशी लग्न करत तिला स्वत:ची बायको केलं. शकीलच्या मुलाच्या दाव्यानुसार, त्याच्या आजी-आजोबांना सर्व काही माहित होते. त्यांनी या संपूर्ण प्रकरणात वडिलांना साथ दिली. निकाहमध्ये पूर्ण मदत केली.

 

शकीलच्या पत्नीनं सांगितलं की, ‘माझ्या मुलानं निकाह करण्यास नकार दिला होता. काहीही झाले तरी मी त्या मुलीसोबत लग्न करणार नाही, असं त्यानं सांगितलं. त्यानंतर माझा नवरा घरात ठेवलेले पैसे आणि सोने घेऊन पळून गेला. मुलीला घेऊन तो फरार झाला. आम्हाला त्याचा डाव समजलाच नाही. ‘आम्ही या मुलीला दत्तक घेतले आहे, असे तो सांगत होता. पण, प्रत्यक्षात त्यानं त्या मुलीशी निकाह केला.

 

सुनेऐवजी मिळाली सवत

हे सर्व प्रकरण तीन वर्षांपासून सुरु आहे, असं शकीलच्या पत्नीनं सांगितलं. ‘ते मला त्या मुलीसाठी मारत असत. मी त्यांना दोनदा पकडले होते. त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला. पण, त्यांनी ऐकले नाही. त्यांना पकडल्यानंतर मुलाचा निकाह तिच्याशी करायचा आहे, असं त्यांनी सांगितलं. त्यासाठी त्यांनी आम्हाला मारहाण केली. या नात्यासाठी घरातील सर्वांना तयार केले.

 

माझा मुलगा 15 वर्षांचा आहे. परिसरातील सर्वांना हा प्रकार माहिती आहे. मुलाचं लग्न ठरल्यावरही ते शांत बसले नाहीत. कोणत्याही सुनेसोबत सासरा इतका बोलत नाही. ते दिवसभर तिच्यासोबत व्हिडिओ कॉलवर बोलत असत. सुरुवातीला कुणीही माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवला नाही. मी आणि मुलाने त्यांच्याविरोधात सर्व पुरावे गोळा केले. त्यानंतर ते पळून गेले.’

 


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button