दत्तसंप्रदयाची निर्मिती कशी झाली ? दत्तात्रयांचे मूळ तीन अवतार कसे प्रकट झाले ?

सं पूर्ण सृष्टीचे पालहान म्हणजे ब्रम्हा, विष्णू आणि महेश असल्याचं हिंदू धर्मात सांगितलं जातं. ब्रम्हा विष्णू महेश या तिन्ही देवतांचा अवतार म्हणजे श्री दत्तगुरु होय. हिंदू धर्मातील दत्त संप्रदाय अत्यंत मोठा आहे.
नवनाथ देखील श्रीदत्तगुरुंचाच अंश असल्याचं म्हटलं जातं. गुरुदेव दत्तांना मानणारा भाविक वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. याच दत्तगुरुंचा कसे अतरले याबाबत आख्यायिका सांगितली जाते ती जाणून घेऊयात.
दत्तसांप्रदायाला फार मोठी परंपरा असली तरी तिला संप्रदायाचे स्वरूप नरसिंह सरस्वतींच्या प्रभावामुळेच आले. असं म्हटलं दातं की, श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी हे दत्तात्रयांचे पहिले अवतार असल्याचं म्हटलं जातं. नृसिंह सरस्वती हे दुसरे अवतार मानले जातात.
जनार्दन स्वामी, एकनाथ, दासोपंत, मुक्तेश्वर, निरंजन रघुनाथ, माणिक प्रभू, अक्कलकोटकर स्वामी, वासुदेवानंद सरस्वती यांनी महापुरुषांनी संप्रदायाची परंपरा चालू ठेवली. दत्तांना मानणारा तरुण वर्गही तितकाच मोठा आहे.
दत्तात्रेय हे महान साधुपुरुष होते. या संप्रदायात शैव आणि वैष्णव तसेच हिंदू व मुसलमान धार्मीय देखील मोठ्या प्रमाणात आहेत. दत्तमाहात्म्य व दत्तप्रबोध ह्या ग्रंथांत ह्या संप्रदायाचे तत्त्वज्ञान आले आहे. गुरुचरित्रात संप्रदायाचा आचारधर्म सांगितला आहे.अवधूतगीता, गुरुगीता व जीवन्मुक्तगीता ह्या ग्रंथांतून संप्रदायाची महती कळते. श्रीदत्तात्रयांच्या पुजेसाठी त्यांच्या मूर्तीऐवजी पादुकांना सर्वात जास्त महत्व दिलं जातं. औदुंबर, नरसोबाची वाडी व गाणगापूर ह्या क्षेत्री दत्तात्रेयाच्या पादुकांची स्थापना केलेली आहे.
पांचाळेश्वर, नरसोबाची वाडी, माहूर, गाणगापूर, लाड कारंजे, कुरुगड्डी, गिरनार ही दत्तसंप्रदायाची प्रमुख क्षेत्रे होत. महाराष्ट्राप्रमाणेच गुजरात, कर्नाटक आणि आंध्रप्रदेशात देखील दत्तसंप्रदाय मोठ्या प्रमाणात पहायला मिळतो.नरसिंह सरस्वतींचा निवासस्थान गाणगापूर असल्याने कर्नाटकात दत्त संप्रदायाचा विपुल प्रसार झाला. त्याचशिवाय दत्तगुरुचे तिसरे अवतार श्री स्वामी समर्थ यांचं निवासस्थान अक्कलकोट असल्याने देखील महाराष्ट्रात दत्तसंप्रदाय विपुल आहे.
दत्तसंप्रदायात गुरुचरित्राला मोठं महत्व आहे. मात्र मराठीतील हे गुरुचरित्र लिहिणारा गृहस्थ हा कानडी होता. आंध्रामधल्या दत्त संप्रदायाची माहिती वेंकटराव यांनी आपल्या लेखात दिली आहे. या संप्रदायाचा अभ्यास करायचा झाला तर अनेक ग्रंथ तेलगू भाषेत लिहिले गेले आहेत. गुजरातमधील गिरनार पर्वतावर श्रीदत्तांचा वास असल्याचं म्हटलं जातं. या ठिकाणी दत्तोपासनेची प्रेरणा घेतलेली बाबा किनराम अघोरी या नावाचा एक सत्पुरुष अठराव्या शतकाच्या होऊन गेले. गिरनार येथे मला दत्तात्रेयाचा साक्षात्कार झाला, असे त्याने आपल्या विवेकसार नावाच्या ग्रंथात लिहिलं आहे. त्याचबरोबर नर्मदा परिक्रमण देखील दत्तसंप्रदायाचाच एक भागल देखील आहे.
श्री नवनाथांची आरती नवनाथा मच्छिन्द्रनाथाची आरती Navnatha Machindrachi Aarti |👇👇👇👇