इस्रायलचा इराणच्या अणुभट्टीवर तीव्र हल्ला; आतापर्यंत शेकडो लोकांचा मृत्यू …

सध्या इराण आणि
इस्रायलमधील युद्ध अधिक पेटले आहे. नुकतेच इस्रायलने इराणच्या अणु भट्टीवर तीव्र हल्ला केला आहे. इराणमधील अरक हेवी वॉटर रिअॅक्टरवर हल्ला केला आहे.
या हल्ल्यानंतर इराणचे मोठे नुकसान झाल्याचे म्हटले जात आहे, मात्र अद्याप इराणकडून यावर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.
तसेच काही तासांपूर्वीच इस्रायलच्या सुरक्षा दलाने अरक आणि खोंडूब शहरांमधील लोकांना परिसर रिकामा करण्याचा इशारा दिला होता. या परिसरात इराणची गेवी वॉटर अणुभट्टी आहे. हा इराणच्या अणु कार्यक्रमाचा एक महत्त्वपूर्ण भाग आहे. तसेच या भागात इराणच्या शस्त्रास्त्रांचे उत्पानही केले जाते.
गुरुवारी सकाळी इराणने इस्रायलच्या बिरशेबा येथील सोरोका रुग्णलायवार हल्ला केला होता. यामुळे इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंनी संताप व्यक्त केला होता. यानंतर इस्रायलने अरक आणि खोंडूब शहरांमधील लोकांना परिसर रिकामा करण्याचा इशारा दिला होता. या इशाऱ्याच्या काही नंतरच इस्रायलने इराणच्या अणुभट्टीवर हल्ला केला.
इराणने इस्रायलच्या तेल अवीव, बेरशेबा, मत गान आणि होलोन या चार इस्रायली शहरांवर देखील क्षेपणास्त्रे डागली. या हल्ल्यात १७६ जखमी झाले आहेत, अनेक अनेकांचा मृत्यू देखील झाला आहे.
नेतन्याहूंनी केला संताप व्यक्त
दरम्यान इराणच्या या हल्ल्यानंतर पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी संताप व्यक्त केला आहे. इराण जाणूनबुजून त्यांच्या नागरिकांना लक्ष्य करत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. आतापर्यंतच्या हल्ल्यात २४ इस्रायली लोकांचा मृत्यू झाला आहे, तर इराणी लोकांच्या मृत्यूची संख्या ६३९वर पोहोचली आहे. दोन्ही देश एकमेकांवर सतत हल्ले करत आहेत.
इस्रायलचे संरक्षण मंत्री काट्झ यांनी देखील इस्रायली संरक्षण दलांना तेहरानमधील इराणी धोरणात्मक प्रतिष्ठांवर देखील हल्ला करण्याचे निर्देश दिले आहे. यामुळे अयातुल्लाची राजवट कमकुवत होईल असे त्यांचे म्हणणे आहे.
सातव्या दिवशीही हल्ले सुरूच
इस्रायल आणि इराणमधील हा संघर्ष गेल्या सात दिवसांपासून सुरु आहे. १३ जून रोजी इस्रायलने केलेल्या इराणच्या अणु तळांवरील, तसेच लष्करी कमांड सेंटर्सवर हल्ला केला होता. त्यानंतर इराणने देखील प्रत्युत्तरात्मक कारवाई सुरु केली. सध्या दोन्ही देशांमधील तणाव शिगेला पोहोचला आहे. यामुळे जागतिक स्तरावर चिंतेच वातावरण निर्माण झाले आहे.