ताज्या बातम्या

अहमदाबाद लंडन विमान दुर्घटनेबाबत आजपर्यंतचा सर्वात धक्कादायक दावा!


गुजरातच्या अहमदाबादमध्ये भयानक दुर्घटना घडली. अहमदाबादहून लंडनला जाणारं एअर इंडियाचं बोईंग विमान उड्डाणानंतर अवघ्या 30 सेकंदात कोसळलं. या विमानातून 242 जण प्रवासी करत होते.

त्यातील 241 जणांचा मृत्यू झाला. या विमान दुर्घटनेची कसून चौकशी सुरु आहे. अशातच अहमदाबाद लंडन विमान दुर्घटनेबाबत धक्कादायक अपडेट समोर आली आहे. अहमदाबाद लंडन विमान दुर्घटनेबाबत आजपर्यंतचा सर्वात धक्कादायक दावा करण्यात आला. प्लेन क्रॅश होण्याबबात हा दावा आहे.

 

अहमदाबादमध्ये एअर इंडियाच्या बोईंग 787-8 ड्रीमलायनर विमानाच्या अपघाताने संपूर्ण जगात खळबळ उडाली. जगातील सर्व विमान वाहतूक तज्ञ आता या अपघातामागील खरे कारण शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. आतापर्यंत समोर आलेले फुटेज आणि पुरावे पाहिल्यानंतर, बहुतेक तज्ञांनी पक्ष्यांच्या धडकेमुळे आणि लँडिंग गियरमुळे विमान अपघात होण्याची शक्यता नाकारली आहे. या विमान अपघातासाठी तज्ञांनी आतानवीन सिद्धांत मांडला आहे. ‘एअर लॉक’ असा हा सिद्धांत आहे.

 

विमान वाहतुकीत, एअर लॉक म्हणजे अशी परिस्थिती जिथे विमानाच्या इंजिन किंवा इंधन पाइपलाइनमध्ये हवेचे बुडबुडे अडकतात. हवेचे बुडबुडे अडकल्यामुळे, इंजिन आणि हायड्रॉलिक सिस्टममध्ये इंधनाचा प्रवाह थांबतो, ज्यामुळे विमानाच्या उड्डावर परिणाम होतो. या बुडबुड्यामुळे इंधनाचा पुरवठा थांबतो, ज्यामुळे इंजिनला वीज मिळत नाही. अशा स्थितीत विमानाला प्रेशर न मिळाल्याने ते वर जाण्याऐवजी खाली पडू लागते. बोईंग 787 सारख्या विमानात दोन इंजिन असतात आणि ते एकाच इंजिनवर उडू शकते. परंतु जर दोन्ही इंजिनमध्ये इंधन पुरवठा थांबला तर अपघाताची शक्यता असते.

 

अहमदाबाद लंडन विमान दुर्घटनेच्या तपासादरम्यान असे दिसून आले की विमानाच्या पायलटने ‘मेडे’ कॉल केला होता. जो आपत्कालीन परिस्थितीत दिला जातो. काही तज्ञांचे मत आहे की एअर लॉक हे या अपघाताचे संभाव्य कारण असू शकते. देखभालीदरम्यान विमानाच्या इंधन टाकीमध्ये किंवा पाइपलाइनमध्ये हवा अडकल्यास, त्यामुळे एअर लॉक होऊ शकतो. तसेच, जर इंधन प्रणालीमध्ये हवेचे बुडबुडे राहिले तर, इंजिनला इंधन पुरवठा विस्कळीत होऊ शकतो. यामुळे इंजिनची शक्ती कमी होऊ शकते किंवा ते पूर्णपणे काम करणे थांबवू शकते.

 

तज्ज्ञ कॅप्टन स्टीव्ह शीबनर यांच्या मते, अहमदाबाद अपघातात, विमानाचे राम एअर टर्बाइन (RAT) सक्रिय झाले होते, जे सहसा विमानाच्या इंजिनमध्ये किंवा इलेक्ट्रिकल सिस्टममध्ये समस्या असल्यास काम करते. अहमदाबाद विमान अपघातात, हे सूचित करते की कदाचित दोन्ही इंजिनांना इंधन पुरवठा थांबला असेल, ज्याचे एक कारण एअर लॉक असू शकते.

 


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button