ताज्या बातम्या

लवकरच महासंकट? समुद्रातला तो दरवाजा खुलणार? मोठी भविष्यवाणी!


Baba Vanga : बाबा वेंगा यांच्यानंतर आता जपानमधील रियो तात्सुकी यांच्या भविष्यवण्या जगाचं लक्ष वेधून घेत आहेत. रियो यांनी याआधी केलेल्या भविष्यवाणी सत्यात उतरल्या आहेत.

याच रियो तात्सुकी यांनी जगाची चिंता वाढवणारी भविष्यवाणी व्यक्त केली आहे. त्यांनी समुद्रातील एक दरवाजा उखडणार आहे. त्यामुळे मोठं संकट येणार असल्याचं भविष्य व्यक्त केलंय.

 

जुलै महिन्यात येणार मोठं संकट

विशेष म्हणजे ही भविष्यवाणी ऐकून 83 टक्के लोकांनी जपानला जाणाऱ्या विमानांची तिकिटं रद्द केली आहेत. रियो तात्सुकी यांनी याआधी कोरोना महासाथीचं भविष्य वर्तवलं होतं. त्यांचं 90 च्या दशकातलं ‘द फ्यूचर आय सॉ’ नावाचं एक पुस्तक आहे. या पुस्तकात त्यांनी येणाऱ्या जुलै महिन्यात जपानमध्ये मोठं संकट येणार असल्याचं भविष्य वर्तवलं आहे.

जपानमध्ये नेमकं काय होणार?

रियो तात्सुकी यांच्या भविष्यवाणीनुसार येत्या 5 जुलै रोजी जपान तसेच फिलीपिन्स दरम्यान समुद्राच्या तळाशी एक मोठी भेग पडणार आहे. त्यामुले तोहोकू भूकंप येणार आहे. या भूकंपामुळे समुद्रात उंच-उंच लाटा येतील, अशी भविष्यवाणी रियो तात्सुकी यांनी केलीय.
या भविष्यवाणीनंतर आता लोक जुलै महिन्यात जपानला जाण्याचे टाळत आहेत. ब्लूमबर्ग इंटेलिजन्सच्या रिपोर्टनुसार या भविष्यवाणीची तारीख जशी-जशी जवळ येत आहे तसे तसे लोक विमानाच्या तिकिटांचं बुकिंग रद्द करत आहेत. विमान तिकिटांच्या बुकिंगचे प्रमाण 50 टक्क्यांनी घटले आहे. विशेषत: बोईंग विमानांच्या तिकीट कॅन्सलेशनचे प्रमाण हे 15 ते 20 टक्के आहे. अनेक प्रवासी हे मंगा यांच्या भविष्यवाणीमुळे विमान प्रवासाची तिकिटं रद्द करत आहेत.

 

अनेक भविष्यवाण्या ठरल्या खऱ्या

दरम्यान, या भविष्यवाणीची सगळीकडे चर्चा होत असली तरी मियागी प्रांताचे गव्हर्नर योशीहिरो मुराई यांनी या अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन केले आहे. तसेच काहीही चिंता करू नका. लोकांनी प्रवास करावा, असेही त्यांनी म्हटले आहे. रियो तात्सुकी यांनी याआधीही अनेक मोठ्या भविष्यवाणी केलेल्या आहेत. यामध्ये मार्च 2011 च्या तोहोकू भूकंप आणि त्सुनामी, राजकुमारी डायना यांचा मृत्यू, फ्रेडी मर्करी यांचे निधन, कोरोना महासाथ यांचा समावेश आहे.

 

Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button