धीरेंद्र शास्री यांची कथा ऐकल्यानंतर 7 जणांची कारमध्ये आत्महत्या, कारण ऐकून बसेल धक्का …

हरियाणातील पंचकूला येथे एकाच कुटुंबातील ७जणांनी कारमध्ये विष प्राशन करून आत्महत्या केली. आज मंगळवारी आलेल्या या दुःखद बातमीने संपूर्ण देश हादरून गेला.
आश्चर्याची गोष्ट म्हणजे संपूर्ण कुटुंब बागेश्वर धामचे बाबा धीरेंद्र शास्त्री यांची कथा ऐकण्यासाठी आले होते. ते घरीही पोहोचले नाहीत आणि वाटेतच हे भयंकर पाऊल उचलले.
कुटुंब उत्तराखंडच्या देहरादूनचे रहिवासी होते
मृत कुटुंब उत्तराखंडच्या देहरादूनचे रहिवासी होते. मृतांमध्ये कुटुंबप्रमुख प्रवीण मित्तल, त्यांची पत्नी, वृद्ध आई-वडील आणि ३ मुले आहेत. तीनही निष्पाप मुलांचे वय १० ते १५ वर्षांच्या दरम्यान आहे. तिघेही चंदीगडच्या सेक्टर २८-डी मधील मॉडेल स्कूलमध्ये शिकत होते. प्रवीण यांनी काही काळापूर्वीच देहरादूनमध्ये टूर अँड ट्रॅव्हल्सचा व्यवसाय सुरू केला होता.
देहरादूनमध्ये टूर अँड ट्रॅव्हल्सचा व्यवसाय सुरू केला होता
पोलिसांच्या प्राथमिक तपासात असे समोर आले आहे की प्रवीण यांनी देहरादूनमध्ये टूर अँड ट्रॅव्हल्सचा व्यवसाय सुरू केला होता, परंतु त्यात सतत तोटा होत होता. त्यानंतर कुटुंब कर्जबाजारी होत गेले. आर्थिक परिस्थिती इतकी बिकट झाली होती की घरखर्च चालवणेही कठीण झाले होते. ते इतके खचले की त्यांना आत्महत्येशिवाय दुसरा कोणताही मार्ग दिसला नाही.