या गावामधील घरांसमोर टांगतात पुरुषांचे गुप्तांग, ज्योती मल्होत्रा तिथे गेली अन्…

पण सगळ्यांनी कधी ना कधी गाड्यांवर किंवा आ दुकानाबाहेर लिंबू-मिरची टांगलेली पाहिलीच असेल. यामागे वाईट नजर लागू नये हा उद्देश असतो. पण तुम्ही कधी असं गाव पाहिलंय का, जिथे लोक आपल्या घराबाहेर पुरुषांच्या गुप्तांगांच्या आकृत्या टांगतात?
होय, भूतानमधील चिमी ल्हाखांग मंदिर परिसरातील लोबेसा गावात असंच घडतं. ही एक धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरा आहे. विशेष म्हणजे, पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक झालेली ज्योती मल्होत्रा देखील या गावात गेली होती. तिचा हा व्हिडिओ यूट्यूबवरही उपलब्ध आहे.
भूतानमधील चिमी ल्हाखांग मंदिर: एक अनोखी श्रद्धा
भूतानमधील पुनाखा जिल्ह्यातील लोबेसा गावात चिमी ल्हाखांग मंदिर, ज्याला “फर्टिलिटी टेम्पल” (प्रजनन मंदिर) म्हणूनही ओळखलं जातं. हे मंदिर लामा द्रुकपा कुनले यांना समर्पित आहे. त्यांना स्थानिक लोक “डिव्हाइन मॅडमन” म्हणजेच ‘दैवी वेडा’ म्हणून ओळखतात.
या परंपरेची कहाणी काय?
लामा द्रुकपा कुनले यांना ही ख्याती त्यांच्या असामान्य, विनोदी आणि प्रतीकात्मक शिक्षण पद्धतीमुळे मिळाली. असे म्हटले जाते की, त्यांनी आपल्या “लिंगाच्या शक्ती”ने एका राक्षसी आत्म्याचा पराभव केला होता. त्यानंतर लिंग हे त्यांचं प्रतीक बनलं आणि त्याचं सांस्कृतिक महत्त्व वाढलं.
घरांच्या भिंतींवर लिंगाच्या चित्रांचं कारण काय?
चिमी ल्हाखांग मंदिराच्या आजूबाजूच्या घरांवर आणि दुकानांवर रंगीबेरंगी, सुंदर डिझाइन असलेली लिंगाची चित्रं पाहायला मिळतात. याशिवाय, मंदिराच्या प्रवेशद्वारांवर लाकडावर कोरलेली मोठी आणि छोटी लिंगाची प्रतीकंही दिसतात. स्थानिकांच्या श्रद्धेनुसार, ही प्रतीकं केवळ प्रजनन क्षमता (फर्टिलिटी) वाढवत नाहीत, तर वाईट आत्म्यांना दूर ठेवण्यास आणि घराचं नकारात्मक शक्तींपासून संरक्षण करण्यासही मदत करतात.
संतानप्राप्तीसाठी श्रद्धेचं केंद्र
हे मंदिर विशेषतः संतानप्राप्तीच्या इच्छा असलेल्या दांपत्यांमध्ये प्रसिद्ध आहे. दरवर्षी हजारो भाविक या मंदिरात दर्शनासाठी येतात आणि आशीर्वाद मागतात. नवविवाहित महिला किंवा संतानाची इच्छा असलेल्या महिला येथे विशेष पूजा करतात. ज्या पालकांना संतान झालं आहे, ते आपल्या मुलांचं नामकरण करण्यासाठीही येथे येतात.
द्रुकपा कुनले आणि चिमी ल्हाखांगचा इतिहास
चिमी ल्हाखांग मंदिर १४व्या द्रुकपा लामा नवांग चोग्याल यांनी बांधलं. मंदिराच्या मध्यभागी असलेलं स्तूप द्रुकपा कुनले यांच्या सन्मानार्थ बांधण्यात आलं आहे. स्थानिक मान्यतांनुसार, द्रुकपा कुनले यांनी एका भूताचा पराभव करण्यासाठी लिंगाच्या आकाराचा दांडा बनवला आणि त्याला मारून एका स्तूपात पुरलं. तेव्हापासून लिंगाचं प्रतीक हे दुष्ट शक्ती नष्ट करणारं आणि कल्याणकारी मानलं जातं.
ज्योती मल्होत्राने काय केलं?
पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक झालेली ज्योती मल्होत्रा या गावात गेली होती. तिने तिथे एका दुकानात पुरुषांच्या गुप्तांगांच्या आकृत्या विकत घेण्याबाबत चौकशी केली आणि तिथल्या स्थानिक परंपरांचा व्हिडिओ बनवला, जो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
चिमी ल्हाखांगला कसे जायचे?
चिमी ल्हाखांग मंदिर पुनाखापासून सुमारे १० किलोमीटर अंतरावर लोबेसा गावात आहे. येथे जाण्यासाठी दोन मुख्य मार्ग आहेत:
-खासगी टॅक्सी: थिंपू किंवा पारोपासून तुम्ही खासगी टॅक्सीने सहज पोहोचू शकता. रस्ता अगदी सरळ आहे.
-स्थानिक बस: थिंपू किंवा पारोपासून वांगडूपर्यंत स्थानिक बसने जा. वांगडूपासून तुम्हाला मंदिरापर्यंत टॅक्सी घ्यावी लागेल. या मंदिरात फोटोग्राफीला परवानगी नाही आणि मोठ्याने बोलणंही अयोग्य मानलं जातं.