‘रस्त्यानं जात होती, वाट अडवली अन् झुडपात नेलं’ त्या’ रात्री नेमकं काय घडलं ?

चा कण येथील महिलेला रस्त्यावरून फरफटत नेत बलात्कार केल्याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. तसेच न्यायालयाने नराधमाला २० मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणी आरोपीने कबुलीजबाब दिला आहे.
त्यात त्याने गुन्हा केला असल्याचं कबुल केलं आहे. या धक्कादायक प्रकारानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
नेमकं प्रकरण काय?
ही धक्कादायक घटना मंगळवारी १३ मे रोजी घडली. नाईट शिफ्ट असल्यामुळे महिला चाकणच्या मेदनकरवाडी परिसरातून चालत जात होती. यादरम्यान आरोपीने तिला एकटीने जात असल्याचं पाहिलं. नंतर खंडोबा मंदिराजवळ तिचा रस्ता अडवला. आरोपीने वाट अडवत तिला जबरदस्तीने ओढून निर्जनस्थळी नेले. कुणी नसल्याचं फायदा घेत आरोपीने तरूणीवर बलात्कार केला.
पीडितेसोबत लैंगिक अत्याचार सुरू असताना आरोपीने आरडाओरडा केला. तिथे एक मुलगा शतपावली करत होता. त्याला मदतीला बोलावण्यासाठी तिने हाक मारली. पंरतु तो प्रयत्न निष्फळ ठरला. कारण त्या तरूणापर्यंत तिचा आवाज पोहोचलाच नाही. आरोपीने अत्याचार केल्यानंतर तेथून पळ काढला.
या घटनेनंतर पीडितेने पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी तातडीने सहा विशेष पथके तयार करून सगळे सीसीटीव्ही फुटेज तपासले. पोलिसांनी काही तासांत आरोपीला अटक केली. अटक केल्यानंतर त्याला कोर्टात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला २० मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
आरोपीबाबत माहिती
आरोपीने गुन्हा केल्यानंतर कबुली दिली. नराधम हा अविवाहित असून, एका कंपनीत कामगार असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करीत असून, या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.