
पु णे : नवऱ्याच्या अनैतिक संबंधाला कंटाळून पत्नीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास करत आहेत.
माधुरी विकास कोकणे असे मृत महिलेचे नाव आहे. या प्रकरणी पती विकास कोकणे आणि नवऱ्याची मैत्रीण अर्चना अहिरे हिच्या विरोधात पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृत विवाहितेच्या भावाने भारती पोलीस ठाण्यात आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
माधुरी आणि विकासचा विवाह काही वर्षापूर्वी झाला होता. मात्र विकासच्या विवाहबाह्य संबंधामुळे दोघांमध्ये वारंवार वाद होते. प्रेयसीच्या सांगण्यावरून विकास पत्नीवर मानसिक आणि शारीरिक अत्याचार करत होता, या अत्याचाराला कंटाळून माधुरीने आत्महत्या केल्याचे प्राथमिक तपासातून समोर आले आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.