ताज्या बातम्या

पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया, पाकिस्तानला म्हणाले ‘ऑपरेशन सिंदूर फक्त..’


ऑपरेशन सिंदूर न्यायाची प्रतिज्ञा आहे अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकिस्तानला ठणकावलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींना आज देशाला संबोधित केलं.

पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिलं असून, यानंतर दोन्ही देशात तणाव आहे. या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदी काय बोलणार याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं होतं. ऑपरेशन सिंदूर फक्त नाव नाही, तर देशातील कोटी कोटी लोकांच्या भावनांचं प्रतिबिंब आहे असंही मोदी म्हणाले आहेत.

 

“गेल्या काही दिवसात संपूर्ण जगाने देशाचं सामर्थ्य आणि संयम पाहिला आहे. मी सर्वात आधी भारताच्या सशस्त्र दलांचं. गुप्तचर यंत्रणा, वैज्ञानिक यांना प्रत्येक भारतीयाच्या वतीने सलाम करतो. आपल्या शूर सैनिकांनी ऑपरेशून सिंदूरमध्ये शूर कामगिरी केली. मी त्यांची वीरता, साहस, पराक्रमाला आज समर्पित करतो. आल्या देशातील प्रत्येक आई, बहीण आणि प्रत्येक मुलीला हा पराक्रम समर्पित करतो,” असं नरेंद्र मोदी म्हणाले.

 

“22 एप्रिलला पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी जे कृत्य केलं, त्याने देश आणि जगाला बेचैन केलं होतं. सुट्टी साजरी कऱणाऱ्या निर्दोषांना धर्म विचारुन त्यांच्या कुटुंबीयांसमोर, मुलांच्या समोर निर्दयीपणे मारुन टाकलं. हा दहशतवादाचा विभत्स चेहरा आहे. ही क्रूरता होती. देशाची सद्भावना तोडण्याचा प्रयत्नही होता. माझ्यासाठी व्यक्तिगतरित्या फार मोठं दु:ख होतं. या दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देश, प्रत्येक नागरिक, समाज, वर्ग, राजकीय परक्ष एका सूरात दहशतवादाविरोधात कठोर कारवाईसाठी उभा राहिला,” असंही नरेंद्र मोदींनी सांगितलं.

 

पुढे ते म्हणाले, “आम्ही दहशतवाद्यांना मातीत मिसळण्यासाठी भारतीय सैन्याला पूर्ण सूट दिली होती. आज प्रत्येक दहशतवादी, दहशतावादी संघटनेला आमच्या बहिणी, मुलींचा कपळावरुन सिंदूर हटवण्याचा काय परिणाम असतो हे समजलं आहे. ऑपरेशन सिंदूर फक्त नाव नाही, तर देशातील कोटी कोटी लोकांच्या भावनांचं प्रतिबिंब आहे. ऑपरेशन सिंदूर न्यायाची प्रतिज्ञा आहे”.

 

“6 मेच्या रात्री आणि 7 मेच्या सकाळी संपूर्ण जगाने या प्रतिज्ञेला सत्यात उतरताना पाहिलं. भारतीय सैन्याने पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या ठिकाणांना, प्रशिक्षण केंद्रावर प्रहार केला. दहशतवाद्यांनी स्वप्नातही विचार केला नव्हता की, भारत इतका मोठा निर्णय घेईल. पण जेव्हा देश एकत्र येतो, देश पहिला या भावनेने भरलेला असतो, राष्ट्र सर्वपरी असतं तेव्हा असे निर्णय घेतले जातात. परिणाम दाखवले जातात. जेव्हा पाकिस्तानने दहशतवादी ठिकाणांवर भारताने हल्ला केला तेव्हा दहशतवादी संघटनांची इमारतीच नाही, तर धैर्यही कोसळलं आहे. बहावलपूर आणि मुरीदसारखी दहशतवादी ठिकाणं एकाप्रकारे जागतिक दहशतवादाची युनिव्हर्सिटी राहिली आहे. जगात कुठेही जे मोठे दहशतवादी हल्ले झाले आहेत त्या सगळ्याचं कनेक्शन यांच्याशी जोडलं आहे,” असंही त्यांनी म्हटलं.

 

पुढे ते म्हणाले. “भारताच्या या हल्ल्यांमध्ये 100 हून अधिक दहशतवाद्यांना ठार केलं आहे. त्यांचे अनेक आका खुलेआम पाकिस्तानात फिरत होते. जे भारताविरोधात षडयंत्र रचत होते. त्यांना भारताने एका झटक्यात संपवंल आहे. भारताच्या या कारवाईमुळे पाकिस्तान घोर निराशेत आहे. पाकिस्तान घाबरला आहे. आणि त्याचमुळे त्यांनी आणखी एक प्रयत्न केला. भारताच्या कारवाईचं समर्थन करण्याऐवजी भारतावरच हल्ला करण्यास सुरुवात केली. पाकिस्तानने शाळा, कॉलेज, गुरुद्वारा, मंदिरं, सामन्यांची घरं यांना लक्ष्य केलं. पाकिस्तानने आपल्या सैन्य ठिकाणांना लक्ष्य केलं. पण यातही पाकिस्तानचचा बुरखा फाटला. जगाने पाकिस्तानचे ड्रोन, मिसाईल भारतासमोर कशाप्रकारे कोसळली हे पाहिलं. भारताच्या एअर डिफेन्सने आकाशतच त्यांनी नष्ट केलं. पाकिस्तानची सीमेवर वार करण्याची तयारी होती, पण भारताने पाकिस्तानच्या छातीवर वार केला”

 

‘प्रत्युत्तर कारवाईला फक्त स्थगित केलं आहे’

आम्ही पाकिस्तानच्या दशतवादी आणि सैन्य ठिकाणांवर आमच्या प्रत्युत्तर कारवाईला फक्त स्थगित केलं आहे. आगामी दिवसात पाकिस्तान काय भूमिका घेत यावर सगळं अवलंबून असेल. आपली तिन्ही दलं, बीएसएफ सतत अलर्टवर आहेत. सर्जिकल स्ट्राईक आणि एअर स्ट्राईकनंतर आता ऑपरेशन सिंदूर दहशतवादाविरोधीताल भारताची कारवाई आहे असंही मोदींनी सांगितलं आहे. “भारताने पहिल्या तीन दिवसात पाकिस्तानला इतकं उद्धवस्त केलं ज्याचा त्यांना अंदाजही नव्हता. भारताच्या आक्रमक कारवाईनंतर पाकिस्तान वाचण्याचे रस्ते शोधत होता. पाकिस्तान जगभरात तणाव कमी करण्यासाठी विनवणी करत होता. वाईट प्रकारे मार खाल्ल्यानंतर 10 मेच्या दुपारी पाकिस्तानी लष्कराने आमच्या डीजीएमओंकडे संपर्क साधला. तोपर्यंत आम्ही दहशतवाद्यांच्या पायाभूत सुविधा मोठ्या प्रमाणात नष्ट केल्या होत्या. पाकिस्तानच्या मनात वसलेल्या दहशतवाद्यांच्या अड्ड्यांना खंडर केलं. त्यामुळे जेव्हा पाकिस्तानने विनवणी केली, आमच्याकडून कोणताही दहशतवादी हालचाल किंवा लष्कर कारवाई केली जाणार नाही तेव्हा विचार केला. आम्ही पाकिस्तानच्या दहशतवादी आणि सैन्य ठिकाणांवर आमच्या प्रत्युत्तर कारवाईला फक्त स्थगित केलं आहे. आगामी दिवसात पाकिस्तानच्या प्रत्येक पावलावर, काय भूमिका घेत यावर सगळं अवलंबून असेल. आपले तिन्ही दलं, बीएसएफ, निम लष्कर सतत अलर्टवर आहेत. सर्जिकल स्ट्राईक आणि एअर स्ट्राईकनंतर आता ऑपरेशन सिंदूर दहशतवादाविरोधीताल भारताची निती आहे,” असंही मोदींनी सांगितलं आहे.

 

ऑपरेशन सिंदूरने दहशतवादाविरोधातील लढाईत एक नवी रेषा खेचली आहे. तसंच तीन मुद्दे मांडत मोदींनी इशारा दिला आहे.

1) भारतावर दहशतवादी हल्ला केला तर चोख प्रत्युत्तर दिलं जाईल. आमच्या प्रकारे, आमच्या अटींवर उत्तर देऊनच राहणार. प्रत्येक त्या ठिकाणी जाऊन कठोर कारवाई करु जिथे दहशतवादाची पाळंमुळं आहेत.
2) न्यूक्लिअर ब्लॅकमेल भारत सहन करणार नाही. त्या ठिकाणांवर भारत निर्णायक प्रहार करणार
3) दहशतवादी समर्थित सरकार आणि दहशतवाद्यांच्या आकांना वेगळं पाहणार नाही. ऑपरेशन सिंदूरदरम्यान जगाने पाकिस्तानचं घाणेरडं सत्य पाहिलं. मारलेल्या दहशतवाद्यांना निरोप देण्यासाठी पाकिस्तानचे मोठे अधिकारी पोहोचले होते. राज्य पुरस्कृत दहशतवादाचा हा मोठा पुरावा आहे. भारत आणि आपल्या नागरिकांना कोणत्याही धोक्यापासून वाचवण्यासाठी सतत निर्णयाक पावलं उचलत राहू

“युद्धाच्या मैदानावर भारताने नेहमीच पाकिस्तानला धूळ चारली आहे. आणि आता ऑपरेशन सिंदूरने नवा अध्याय जोडला आहे. आम्ही नव्या युगाच्या युद्धातही आमची श्रेष्ठता स्थापित केली आहे. मेड इन इंडियाच्या शस्त्रांची प्रामाणिकताही सिद्ध झाली आहे. 21 व्या शतकातील युद्धात मेड इन इंडिया शस्त्रांनी सिद्ध केलं आहे,” असंही मोदी म्हणाले.

 

“पाणी आणि रक्तही एकत्र वाहू शकत नाही”

पुढे ते म्हणाले “एकता हीच आपली सर्वात मोठी ताकद आहे. हे युग युद्धाचं नाही, पण हे युग दहशतवादाचंही नाही. दहशतवादाविरोधात झिरो टॉलरन्स एका चांगल्या जगाची गरज आहे. पाकिस्तानी लष्कर, सरकार ज्याप्रकारे दहशतवादाला खतपाणी घालत आहे, ते एक दिवस पाकिस्तानलाच संपवतील. जर पाकिस्तानला वाचायचं असेल तर दहशतवादाला संपवावं लागेल. याशिवाय शांततेचा कोणताही मार्ग नाही. दहशतवाद आणि चर्चा, दहशतवाद आणि व्यापार एकत्र होऊ शकत नाही ही भारताची भूमिका स्पष्ट आहे. पाणी आणि रक्तही एकत्र वाहू शकत नाही”.

 

अखेरीस ते म्हणाले की, “पाकिस्तानशी चर्चा झाली तर दहशतवाद, पाकिस्तानव्याप्त काश्मीवरवरच होईल असंही नरेंद्र मोदींनी जगाला सांगितलं आहे. शांतीचा मार्गही शक्तीतून जातो. भारतीयांनी शांततेत जगण्यासाठी, विकसित भारताचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी भारत शक्तीशाली होणं गरज आहे. गरज लागल्यास या शक्तीचा वापरही गरजेचा आहे. मागील काही दिवसांत भारताने हेच केलं आहे”.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button