मेंदूच्या नसा ब्लॉक होण्यापूर्वी शरीरात दिसून येतात ‘हे’ बदल; सामान्य समजून इग्नोर करू नका ….

आ जकाल लोकांच्या चुकीच्या जीवनशैलीमुळे अनेक गोष्टी बिघडल्या आहे. यामध्ये अनहेल्दी डाएट, व्यायाम न करणं, रात्रीचं जागरण यामुळे अनेक आजारांचा धोका वाढू लागला आहे. ज्यावेळी आपण रात्री उशीरापर्यंत जागरण करतो तेव्हा डोक्यावर त्याचा परिणाम होऊ लागतो.
डोकं म्हणजेच मेंदू आपल्या शरीरातील सर्वात महत्त्वाचा भाग आहे.
डोकं किंवा मेंदूबाबत छोटीशीही आपला जीव धोक्यात आणते. मेंदूमध्ये अडथळा निर्माण झाल्यास रक्तस्त्राव आणि ब्रेन स्ट्रोक सारख्या परिस्थिती उद्भवू शकते. तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार, ज्यावेळी आपल्या मेंदूपर्यंत पुरेसा ऑक्सिजन पोहोचत नाही, तेव्हा नसा ब्लॉक होऊ लागतात. तेव्हा आपल्या शरीरात अनेक लक्षणंही दिसू लागतात. ही लक्षणं कोणती आहेत, ती पाहूयात.
अचानक बोलण्यात अडथळा येणं
जर तुम्हाला अचानक बोलण्यात अडचण जाणवत असेल तर हे मेंदूच्या नसांमध्ये अडथळा निर्माण झाल्याचं लक्षण असू शकतं. स्लर्ड स्पीच्या रूपात देखील ही समस्या समोर येऊ शकते.
चेहऱ्याचा एक भाग सुन्न होणं
जेव्हा मेंदूच्या नसांमध्ये अडथळा येतो तेव्हा शरीराची एक बाजू सुन्न होण्याचा धोका संभवतो. हे विशेषतः चेहऱ्यावर दिसून येऊ शकतं. जर तुम्हाला अशी लक्षणे जाणवत असतील तर ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या.
हातात किंवा पायात अशक्तपणा जाणवणं
जर तुम्हाला अचानक एका हातामध्ये किंवा पायात अशक्तपणा जाणवत असेल तर हे स्ट्रोकचं लक्षण असू शकतं. यामध्ये व्यक्तीला हात आणि पाय हलवण्यात अडचण येऊ शकते. एखादी वस्तू हातात पकडण्यात देखील तुम्हाला त्रास होऊ शकतो.
तोल सांभाळता न येणं
मेंदूच्या नसा ब्लॉक झाल्यावर रूग्णाला स्वतःचा तोल सांभाळणं कठीण होऊ लागतं. अशावेळी रूग्ण बेशुद्ध होणं किंवा चक्कर येणं हा त्रासही जाणवतो.
अशी लक्षणं दिसल्यास काय करावं?
या लक्षणांकडे कधीही दुर्लक्ष करू नये. जर कधीही तु्म्हाला अशी लक्षणं दिसल्यास तुम्ही लगेच डॉक्टरांची मदत घ्यावी. यामध्ये योग्य वेळी उपचार घेतल्यास स्ट्रोकमुळे होणारे नुकसान टाळता येऊ शकतं.