देश-विदेश

भारताचा शत्रू तरीही चीनमध्ये होते या मराठी माणसाची पूजा, अनेक ठिकाणी आहेत पुतळे, काय आहे ?


ची नची भारताबद्दल असलेली भूमिका ही म्हणावी तेवढी चांगली राहिलेली नाहीये, चीनने अनेकदा भारताविरोधात पाकिस्तानला पाठिंबा दिल्याचं देखील समोर आले आहे, चीनने कधी पाकिस्तानला उघड पाठिंबा दिला तर कधी छुपा पाठिंबा दिला, चीनकडून पाकिस्तानला शस्त्रांचा देखील पुरवठा करण्यात येतो, ज्याचा वापर पाकिस्तानकडून भारतविरोधी कारवायांसाठी केला जातो.

चीन कायमच भारतासाठी डोकेदुखी ठरला आहे. मात्र दुसरीकडे चीनमध्ये एका मराठी माणसाची पूजा केली जाते, चीनमध्ये या माणसाचे काही ठिकाणी पुतळे देखील आहेत. एवढंच नाही तर चीनचा कोणी उच्चपदस्थ व्यक्ती आजही भारतात आला तर या माणसाच्या कुटुंबाची आवर्जून भेट घेतो, चला तर जाणून घेऊयात कोण आहे ही व्यक्ती?

 

या मराठी माणसाचं नाव आहे, डॉ. द्वारकानाथ कोटणीस, 1937 साली जपानने चीनवर आक्रमण केलं. या युद्धात चीनची प्रचंड हानी झाली, सैन्यबळ जखमी झालं. अनेक सैनिकांचा मृत्यू झाला. चीनमध्ये हाहाकार उडाला, तेव्हा चीनच्या लष्कर प्रमुखांनी इतर देशांना वैद्यकीय मदत पुरवण्याचं आवाहन केलं होतं. चीनला मदत करावी म्हणून एक पत्र भारताला देखील पाठवण्यात आलं होतं. या पत्रानंतर भारतातून एक डॉक्टरांची टीम चीनला पाठवण्यात आली होती. त्यामध्ये डॉ. द्वारकानाथ कोटणीस यांचा देखील समावेश होता.

 

भारतानं 1938 मध्ये एक रुग्णवाहिकेसह पाच डॉक्टरांचं पथक चीनला पाठवलं होतं. यामध्ये डॉ. द्वारकानाथ कोटणीस देखील चीनला गेले होते. तिथे या डॉक्टरांच्या पथकानं तब्बल साडेतीन वर्ष चीनी सैनिकांवर उपचार केला, असं म्हटलं जातं की, डॉ. कोटणीस यांनी सलग 72 तास कोणताही ब्रेक न घेता चीनी सैन्यांची ऑपरेशन्स केली, त्यांनी या युद्धामध्ये जखमी झालेल्या तब्बल 800 चीनी सैनिकांचे प्राण वाचवले, त्यामुळे त्यांना आजही चीनमध्ये देव मानलं जातं. त्यांची पूजा केली जाते. चीनमधील काही शाळा आणि संग्रहालयांना देखील कोटणीस यांचं नाव देण्यात आलं आहे, तसेच तिथे काही ठिकाणी त्यांचा पुतळा देखील असल्याचं पाहायला मिळतं.

 


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button