
बीड : पत्नीच्या विवाहबाह्य संबंधाला कंटाळून पतीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. ही घटना बीडच्या (Beed Crime) आष्टी पोलीस ठाणे हद्दीतील कासारी गावात घडली आहे.
या प्रकरणी आत्महत्येस कारणीभूत ठरलेल्या पत्नीसह तिच्या प्रियकरावर आष्टी पोलीस (Beed Crime) ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. या घटनेने बीड जिल्ह्यात खळबळ उडाली असून, पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
अधिकची माहिती अशी की, बीड जिल्ह्यातील (Beed Crime) कासारी गावात एक दाम्पत्याचा संसार सुरु होता. मात्र, संसार सुरु असतानाच बायकोचे विवाहबाह्य संबंध सुरु झाले. पत्नी गावातीलच एका परपुरुषासोबत प्रेमसंबंध ठेवल्याने नवरा नैराश्यात गेला. याबाबत नवऱ्याने अनेकदा त्याच्या पत्नीला समजावून देखील सांगितलं. मात्र, तिच्यात कोणताही फरक जाणवला नाही. आपण एवढं समजावूनही पत्नीमध्ये कोणताही फरत दिसत नाही, हे लक्षात आल्यानंतर पतीने गळफास घेत आत्महत्या करण्याचा टोकाचा निर्णय घेतला आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.