देश-विदेश

‘रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत लढू युद्ध’, युद्धविरामनंतर पाकिस्तानी पंतप्रधान शाहबाज शरीफचा समोर आला …


यु द्धविरामासाठी भारतापुढे आणि मध्यस्थीसाठी अमेरिकेपुढे पाकच्या मंत्र्यांनी नाक घासले. चार दिवसांच्या ऑपरेशन सिंदूरने पाकिस्तानला त्याची औकात दाखवली. पण पाकिस्तान सरड्यासारखा रंग बदलणारा आहे हे त्याने काल पुन्हा सिद्ध केले.

भारत द्वेषातूनच पाकिस्तानची निर्मिती झाल्याचे या देशाने पुन्हा अधोरेखित केले. पाकिस्तानने युद्धविरामानंतर सीमेवर गोळीबार केला. त्यात दोन जवानांना वीरमरण आले. दरम्यान पाकिस्तानचा पंतप्रधान पळपुटा शाहबाज शरीफ याच्या वल्गना कमी झालेल्या नाहीत.

 

शनिवारी त्याने देशाला संबोधित केले. त्यावेळी त्याचा युद्धविरामावरील जळफळाट समोर आला. भारत-पाक तणावावर त्याने भाष्य केले. भारताने पहलगाम हल्ल्याचा बहाणा करत पाकिस्तानवर युद्ध थोपवल्याचा आरोप त्याने केला. त्यामुळेच पाकने त्यांना थेट मैदानात मुलाखत करण्याचा संदेश दिल्याची गरळ त्याने ओकली. इतकेच नाही तर भारताने ड्रोन आणि मिसाईलच्या माध्यमातून रहिवाशी भागाना टार्गेट केल्याचा कांगावा सुद्धा केला. रहिवाशी भागात भारताने हल्ला करून आमच्या संयमाची परीक्षा घेतल्याचे शरीफ म्हणाला. भारतीय सैन्याने पाकिस्तानी आर्मी कॅम्प आणि गोळाबारुद उडवण्याचा अयशस्वी प्रयत्न केल्याची पुडी सुद्धा त्याने सोडली.

 

चीनचे मानले विशेष आभार

पाक पीएम शरीफ याने चीनला सर्वात जवळचा आणि विश्वसनीय मित्र असल्याचे म्हटले. त्याने कालच्या भाषणात चीनसाठी आरत्या ओवळल्या. त्याने चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग याच्यासमोर लोटांगण घेतले, त्यांचे विशेष आभार मानले. गेल्या पाच दशकात चीन प्रत्येक संकटात पाकिस्तानच्या पाठीशी असल्याचे गौरद्वागार शरीफ याने काढले. त्याने अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचे सुद्धा आभार मानले. डोनाल्ड ट्रम्प यांच्या मध्यस्थीमुळे दोन्ही देशात युद्धविराम झाल्याचा तो म्हणाला.

 

इतकेच नाही तर पाकिस्तान हे युद्ध जिंकल्याची धुळफेक त्याने कालच्या भाषणात केली. सौदी अरब, संयु्क्त अमिरात यांच्यासह तुर्कीवर त्याने स्तुतिसुमने उधळली. भारताने पाकिस्तानला या कारवाईतून मोठा दणका दिल्याचे समोर आले. त्यांचे मोठे नुकसान झाले आहेत. सोशल मीडियावर पाकिस्तानी युझर्स पाक मंत्र्यांना शिव्या घालत असल्याचे समोर आले आहे. त्यांनी पुन्हा एकदा पाकिस्तानचे नाक कापल्याच्या संतप्त प्रतिक्रिया सोशल मीडियावर दिसून येत आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button