ताज्या बातम्या

शस्त्रास्त्रांसह कराचीत लढाऊ कार्गो जहाज दाखल; तुर्कीचा पाकिस्तानला पाठिंबा …


सध्या भारत आणि

पाकिस्तानमध्ये निवडणुकांची रणधुमाळी सुरु असतानाच गुरुवारी (८ मे २०२५) रात्री पाकिस्तानने ड्रोन आणि क्षेपणास्त्रांच्या साहाय्याने भारतावर एकापाठोपाठ एक हल्ले करण्याचा प्रयत्न केला.

मात्र हे सर्व प्रयत्न निष्फळ ठरले. त्यानंतर भारताच्या तीनही सैन्य दलांनी संयुक्त कारवाई करत जोरदार प्रत्युत्तर दिले. या कारवाईत भारताने लाहोर, सियालकोटसह अनेक पाकिस्तानी शहरांवर ड्रोन हल्ले करून त्यांच्या हवाई संरक्षण यंत्रणा नष्ट केल्या. या पार्श्वभूमीवर तुर्की पाकिस्तानच्या मदतीसाठी पुढे आला आहे.

 

कराचीत तुर्कीचे मालवाहू विमान दाखल

फक्त हवाई नव्हे, तर भारतीय नौदलानेही पाकिस्तानच्या सागरी सुरक्षेवर घाव घातला. भारतीय विमानवाहू युद्धनौका आयएनएस विक्रांतने कराची बंदरावर तुफान हल्ला करत मोठे नुकसान केले. दरम्यान, पाकिस्तानातील कराची विमानतळावर तुर्कीचे एक मालवाहू विमान उतरल्याचे समोर आले आहे. जम्मूमधील ड्रोन हल्ल्यानंतर, या विमानात तुर्कीने ड्रोन पाठवले असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. गुरुवारी रात्री १२ च्या सुमारास हे विमान कराचीत उतरले.

 

तुर्कीचा पाकिस्तानला उघड पाठिंबा

तुर्की आणि पाकिस्तानमधील घनिष्ट संबंध आता अधिक स्पष्ट होत आहेत. ६ आणि ७ मेच्या रात्री भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तान आणि पीओकेमधील नऊ दहशतवादी तळांवर हवाई हल्ले केले होते. या कारवाईविरोधात तुर्कीने भूमिका घेत भारताच्या पावलावर आक्षेप घेतला होता. तुर्कीने युद्धजन्य परिस्थिती उद्भवण्याचा इशारा देत पाकिस्तानबद्दल सहानुभूती व्यक्त केली.

 

अमेरिकेची पाकिस्तानला तंबी

भारताच्या निर्णायक प्रत्युत्तरानंतर पाकिस्तानातील अनेक शहरांमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. याचदरम्यान, अमेरिका देखील या घडामोडींमध्ये सक्रीय झाली असून तिने थेट पाकिस्तानला दहशतवादावरील भूमिकेसाठी फटकारले आहे. अमेरिकेचे परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते टॅमी ब्रूस म्हणाले की, “आज सकाळी परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ आणि भारताचे परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांच्याशी दूरध्वनीद्वारे संवाद साधला. या चर्चेत रुबियो यांनी तातडीने तणाव कमी करण्याची गरज अधोरेखित करत दोन्ही देशांनी शांततेच्या मार्गावर यावे, असे आवाहन केले. भारत-पाकिस्तानमधील थेट संवादासाठी अमेरिका पाठिंबा देत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.”


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button