Video : अल्लाह हू अकबरचा नारा नि गोळीबार. पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर आला, पुढे एकच थरार..

पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर आले आहेत. त्यात बैसरन दरी परिसरात पर्यटक विविध खेळात रमलेले दिसतात. एक पर्यटक जिपलाईनवर जात असतानाच अचानक गोळीबार होतो. त्याचे आवाज स्पष्टपणे ऐकू येतात.
व्हिडिओ येथे पहा !
पर्यटक ऋषीच्या दाव्यानुसार, गोळीबार झाल्याच्या 20 सेकंदनंतर आपल्याला त्याची जाणीव झाली. जिपलाईन ऑपरेटरची एकूणच हालचाल आपल्याला संशयास्पद वाटली. माझ्या अगोदर 9 जण जिपलाईनवर गेले. त्यावेळी हा ऑपरेटर एकदम सामान्य होता. त्याने रेकॉर्ड केलेल्या व्हिडिओत ऑपरेटरच्या मागील एक व्यक्ती खाली बसून कोणतेतरी उर्दू भाषेतील पुस्तक वाचत असल्याचे ऋषीचे म्हणणे आहे.
तो काही तरी पुटपुटत असल्याचा या पर्यटकाचा दावा आहे. या नवीन व्हिडिओनंतर जिपलाईन ऑपरेटर हा तपास यंत्रणेच्या रडारवर आला आहे. या व्हिडिओत तो थोडा अस्वस्थ दिसत आहे. त्याची हालचाल संशयास्पद असल्याचा पर्यटकाचा दावा आहे.