देश-विदेश

दहशतवादी हल्ल्याची गंभीरता पंतप्रधान मोदींनी सौदी अरब दौऱ्यात घेतला मोठा निर्णय


जम्मू काश्मीरमधील पहलगाम भागात झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे. श्रीनगर पासून 100 किलोमीटर लांब असलेल्या पहलगामच्या बैसरन खोऱ्यात हा हल्ला करण्यात आला.

 

पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विधानही समोर आले आहे. ट्रम्प यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटले आहे की, ‘काश्मीरमधून खूप धक्कादायक बातमी आली आहे. दहशतवादाविरुद्ध अमेरिका भारतासोबत खंबीरपणे उभी आहे. आम्ही मृतांच्या आत्म्यास शांती आणि जखमींच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी यासाठी प्रार्थना करतो.’

 

येथे पहा !

 

22 एप्रिल 2025 रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास लष्करी गणवेशात 2 ते 3 दहशतवादी बैसरन खोऱ्यात घुसले आणि पर्यटकांवर गोळीबार केला. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे एकच खळबळ उडाली. लष्करी गणवेशात असल्याने पर्यटकांना दहशतवादी असल्याचा अंदाजच आला नाही.

 


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button