लॉजवर घेवून जात अल्पवयीन मुलीवर बळजबरीने बलात्कार,मुलगी गर्भवती
Crime News : नाशिक – सोशल मीडियावरून झालेल्या ओळखीतून एकाने लॉजवर घेवून जात अल्पवयीन मुलीवर बळजबरीने बलात्कार केल्याचा प्रकार समोर आला आहे. मुलगी गर्भवती राहील्याने हा प्रकार पोलीसात पोहचला असून याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात बलात्कारासह पोस्को कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार साहिल उर्फ आसिफ नुरउददीन सय्यद (रा.शिवाजीनगर सातपूर) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. औद्योगीक वसाहतीत राहणा-या अल्पवयीन मुलीने याबाबत फिर्याद दिली आहे. गेल्या वर्षी इन्टाग्राम या सोशल साईडच्या माध्यमातून तिची संशयिताशी ओळख झाली होती. जानेवारी महिन्यात दोघांच्या गाठी भेटी झाल्याने त्यांच्यातील मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले.
यातून संशयिताने मुलीस वेळोवेळी त्र्यंबकेश्वर रोडवरील वेगवेगळया लॉजिंगमध्ये घेवून जात बलात्कार केला. यातून मुलगी गर्भवती राहिल्याने हा प्रकार पोलीसात पोहचला. अधिक तपास उनिरीक्षक बटूळे करीत आहेत.