नवरदेवाला वरमाला घालत असताना अचानक आला आवाज अन नवरीबाईनं लग्नच मोडलं; प्रकरण काय?

लखनऊ : मंडपातच लग्न मोडल्याची काही प्रकरणं तुम्हाला माहिती असतील. पण एका आवाजामुळे लग्न मोडल्याचं तुम्ही कधी ऐकलं तरी होतं का? लग्नाचं असंच एक प्रकरण समोर आलं आहे. उत्तर प्रदेशमधील हे लग्न.
जिथं नवरीबाई नवरदेवाला वरमाला घालत असताना अचानक आवाज आला आणि त्यानंतर तिनं लग्नच मोडलं आहे.
महोबा जिल्ह्यात हा लग्नसोहळा होता. सियावन गावातील गायत्री आणि गोरहरी गावातील ब्रजकिशोर प्रजापती याचं हे लग्न. वधू-वर स्टेजवर होते आणि वरमालाचा विधी सुरू होता. काही वेळाने वधू वराच्या गळ्यात हार घालणार होती. त्याचदरम्यान एक आवाज आला, एका महिलेचा रडण्याचा आवाज. काही वेळातच आवाज वाढला. नवरीने आवाजाच्या दिशेनं नजर फिरवली. त्यानंतर तिनं लग्नाला नकार दिला.
कोण होती ती महिला?
तीन मुलांची ती आई होती. संतोषी असं तिचं नाव. हमीरपूर जिल्ह्यातील रथ इथं राहणारी ही महिला जिनं आपण नवरदेवाची गर्लफ्रेंड असल्याचं सांगितलं आणि लग्न समारंभात एकच गोंधळ उडाला. तिनं सांगितलं की, ती विवाहित असून तिला तीन मुलं आहेत. नातेवाइकांच्या माध्यमातून ती ब्रजकिशोरला भेटली आणि ते जवळ आल्यानंतर ब्रजकिशोरने तिच्या कपाळावर सिंदूर लावून तिच्याशी लग्न केलं. चार वर्षांपासून ते पती-पत्नीसारखे राहत होते, त्यामुळे नवराही तिला सोडून गेला. आता अशा परिस्थितीत ब्रजकिशोरने न सांगता अचानक लग्न ठरवलं. याची माहिती मिळताच ती 80 किमी दूर आली. हमीरपूरमधील रथ येथून महोबाच्या श्यावन गावात पोहोचली.
पोलिसात पोहोचलं प्रकरण
महोबा जिल्ह्यातील अजनार पोलीस ठाण्यात हे प्रकरण. वधू पक्षानं लग्नास नकार देत पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी सर्व पक्षांना पोलीस ठाण्यात आणून परस्पर सामंजस्यासाठी प्रयत्न केले. वधू गायत्रीने सांगितलं की, हा तिचा आणि तिच्या कुटुंबाचा विश्वासघात आहे. लग्नापूर्वी अशी कोणतीही गोष्ट सांगितली नाही आणि अचानक लग्नाच्या दिवशी प्रेयसीने येऊन वराबद्दलचं सत्य उघड केले.
लग्नात खर्च केलेले पैसे परत करण्याची मागणी वधूच्या कुटुंबीयांनी पोलिसांकडे केली. वधूच्या कुटुंबीयांचं म्हणणं आहे की लग्नासाठी अंदाजे 10 लाख रुपये खर्च झाले आहेत, जे वराकडून वसूल केले जावेत.
नवरदेवाने फेटाळले आरोप
दुसरीकडे नवरदेव ब्रजकिशोरनं महिलेचे सर्व आरोप निराधार असल्याचं सांगत तो महिलेशी फक्त फोनवरच बोलत असे. त्याचा तिच्याशी कोणताही संबंध नाही आणि तो तिच्याशी लग्न करणार नाही, असं म्हटलं.
एकीकडे वराचं सत्य समजल्यानंतर वधूने लग्नास नकार दिला आहे, तर दुसरीकडे लग्नात आलेल्या गर्लफ्रेंडशी लग्न करायला नवरदेवानं नकार दिला.