गेवराई : शहरात छत्रपती संभाजीनगर रोडवर एका खाजगी घरात गर्भ लिंगनिदान करण्याचे काम सुरू असल्याची माहिती आरोग्य विभागाला मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे एलसीबी विभागाचे अधिकारी व आरोग्य अधिकारी यांनी धाड टाकली.
या धाडीत आरोपी मनिषा सानप हिला पोलिसांनी गर्भ लिंगनिदान करत असताना अटक केली असून डॉ.सतीश गवारे हा पळून गेला आहे.
यापूर्वी ही या डॉक्टरने अशाच पद्धतीने गर्भ लिंगनिदान केले होते. या ठिकाणी गर्भपाताचे औषध, सोनोग्राफी मशीन तसेच इतर साहित्य पोलिसांना आढळले आहे. यापूर्वी तत्कालीन बीडचे जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ.सुरेश साबळे यांनीही अशीच धाड टाकली होती. या प्रकरणी यातील मनीषा पवार आणि डॉ.सतीश गवारे यांना न्यायालयाने जमीन दिला. त्यानंतर काही दिवसातच या दोघांना पुन्हा एकदा हे कुकर्म करण्यास सुरूवात केली.
हे ही वाचा👇👇👇👇
https://maharashtranews24.co.in/?p=1120