मुंडन करून सिगारेटचे चटके देत १४ वर्षीय मुलीवर अत्याचार

लोकशाहीच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423046406 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,


अकोला : शहरातील एका गुंडाने एका चौदा वर्षाच्या मुलीचे मुंडन करून तिला सिगारेटचे चटके देत तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी खदान पोलिसांनी आरोपीला अटक केली असून त्याच्यावर गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यावरून खासदार सुप्रिया सुळे यांनी गृहमंत्र्यांवर संताप व्यक्त केला आहे.

सुप्रिया सुळे म्हणाल्या की, एका गावगुंडाची मुलीची विटंबना करुन तिच्यावर अत्याचार करण्यापर्यंत मजल जाते हे अतिशय संतापजनक आहे. कायदा सुव्यवस्था राखण्यात गृहमंत्री सपशेल अपयशी ठरल्याचा हा परिणाम आहे. या गुंडावर फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवून त्याला कठोरात कठोर शिक्षा होणे गरजेचे आहे. शासनाने त्या दृष्टीने आवश्यक पावले उचलून त्या दृष्टीने उचित कार्यवाही करावी. अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.

दरम्यान, सकाळ पासून संबंधित तपास अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून कायद्याच्या चौकटीत आरोपीला शिक्षा केली जाणार आहे. महिला आयोगाच्यावतीने पाठपुरावा करीत असतांना आरोपीला अशा पद्धतीची शिक्षा देण्यात यावी, जेणेकरून या शिक्षेचा वचक इतरांवर देखील राहिला पाहिजे. तसेच अशा पद्धीतीच्या घटना घडू नये. असं महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी म्हटले आहे.