गणेशोत्सवाचा उत्साह; पंतप्रधान मोदींनी मराठीतून दिल्या शुभेच्छा!

देशभरात गणेशोत्सवाचा उत्साह दिसून येत आहे. घरोघरी आज बाप्पाचं आगमन होत आहे. गणरायाचं स्वागत करण्यासाठी सर्व सज्ज झाले आहेत. पंतप्रधान मोदींनीही एक्स (ट्विटर) पोस्टच्या माध्यमातून देशवासियांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
सर्व देशवासीयांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा. गणपती बाप्पा मोरया! pic.twitter.com/iaDSrS0JyA
— Narendra Modi (@narendramodi) September 19, 2023
पंतप्रधान मोदींनी मराठीतून पोस्ट करत शुभेच्छा दिल्या आहेत. ‘सर्व देशवासीयांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा. गणपती बाप्पा मोरया!’ असं त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. यासोबतच त्यांनी पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिरातील आपला फोटो पोस्ट केला आहे.
PM मोदींनी हिंदीमध्ये देखील दुसरं एक ट्विट करत देशातील नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत. देशभरातील माझ्या कुटुंबीयांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा. विघ्नहर्ता-विनायकाचा हा उत्सव तुम्हा सर्वांच्या जीवनात सौभाग्य, यश आणि संपन्नता घेऊन येवो. गणपती बाप्पा मोरया! अशा आशयाच्या शुभेच्छा पंतप्रधानांनी दिल्या आहेत.