शिंदे सरकार सहा महिन्यांत कोसळू शकते. त्यामुळे मध्यावधी निवडणुका लागण्याची शक्यता

बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क करा. संपर्क : 9226040506

राज्यातील शिंदे सरकार सहा महिन्यांत कोसळू शकते. त्यामुळे मध्यावधी निवडणुका लागण्याची शक्यता आहे. तेव्हा येत्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत विधानसभेचा पाया मजबूत करा, असे आदेश राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज आमदारांना दिले.

राष्ट्रवादीचे नेते आणि आमदारांची बैठक यशवंतराव चव्हाण सेंटर येथे आज पार पडली. या बैठकीत मार्गदर्शन करताना शरद पवार यांनी मध्यावधी निवडणुकांचे संकेत दिले. याविषयीची माहिती आमदार छगन भुजबळ यांनी दिली. ते म्हणाले, दोन महिन्यांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत. तेव्हा जोरदार तयारी करा, असे निर्देश शरद पवार यांनी दिले आहेत.