दक्षिण कोरियाच्या सीमेवरून ऐलियन्सने फुग्यांमध्ये कोरोना व्हायरस भरून फेकला – किम जोंग

बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क करा. संपर्क : 9226040506

 जगभरात कोरोनाने आधीच धुमाकूळ घातला आहे. मागीत तीन वर्षांपासून संपूर्ण जग कोरोनामुळे त्रस्त आहे. जगभरात दररोज लाखो नवीन कोरोना रुग्णांची नोंद होत आहे. मात्र कोरोना व्हायरस कसा आणि कुठून आला याबाबत आतापर्यंत ठोस पुरावा मिळालेला नाही.
मात्र कोरोना व्हायरसच्या उत्पत्तीविषयी उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग उन यांनी अजब दावा केला आहे. त्यांच्या दाव्याची चर्चा जगभरात होत आहे.किम जोंग उन यांनी म्हटलं की, जगात कोरोना व्हायरस परग्रहावरील ऐलियन्सने पृथ्वीवर पसरवला आहे. उत्तर कोरियातील पहिला रुग्ण देखील ऐलियन्समुळेच सापडला. किम जोंग यांनी दावा केली की, दक्षिण कोरियाच्या सीमेवरून ऐलियन्सने फुग्यांमध्ये व्हायरस भरून आमच्याकडे फेकला. त्यानंतरच देशात कोरोना व्हायरस पसरला.

दरम्यान उत्तर कोरियात याआधीच एक अफवा पसरलेली आहे. ज्यानुसार एप्रिलमध्ये एका 18 वर्षीय सैनिक आणि पाच वर्षाच्या मुलाने ऐलियन्स सदृश्य व्यक्तीला स्पर्श केला होता. त्यानंतर दोघांमध्ये कोरोनाचे लक्षण आढळून आले आणि उत्तर कोरियात कोरोना रुग्णांमध्ये वाढ झाली.उत्तर कोरियाची वृत्तसंस्था KCNA नुसार, सरकारने सीमेला लागून असलेल्या भागांसाठी काही सूचना दिल्या आहेत. यानुसार सीमेजवळ राहणाऱ्या लोकांनी हवेतून येणारे फुगे किंवा एलियन सारख्या गोष्टींपासून सावध राहावे. असा प्रकार कोणाला दिसल्यास पोलिसांना कळवा.