ताज्या बातम्या

मावळचा आगामी खासदार हा कॉंग्रेसचाच असणार – आमदार प्रणिती शिंदे


पिंपरी – ‘जोपर्यंत मावळ लोकसभा मतदार संघ आपला होत नाही, तोपर्यंत येथे येतच राहणार. मावळ हा कॉंग्रेसचाच असणार आहे. ‘समझनेंवालों को इशारा काफी है’, असे सांगत त्यांनी शिवसेना व राष्ट्रवादी कॉंग्रेसला मावळमध्ये आव्हान दिले आहे.मावळ लोकसभा मतदार संघाच्या कॉंग्रेसच्या निरीक्षक, पक्षाच्या कार्याध्यक्ष आणि आमदार प्रणिती शिंदे यांनी चिंचवडमध्ये मावळ लोकसभा मतदारसंघा संदर्भात नुकतीच आढावा बैठक घेतली.आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने स्थानिक पातळीवरील राजकीय स्थितीची माहिती घेण्याकरता निरीक्षक म्हणून महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटी कार्याध्यक्ष प्रणिती शिंदे, चारुलता टोकस, आमदार संजय जगताप, पिंपरी चिंचवड कॉंग्रेस वरिष्ठ उपाध्यक्ष भरत वाल्हेकर यांच्या उपस्थितीमध्ये चिंचवड येथे बैठक पर पडली. यावेळी सामाजिक कार्यकर्त्या सुप्रिया वाल्हेकर, जयश्री खैरे, हरमिंदरजीत राय, रामचंद्र वांजळे, स्मिता वाल्हेकर, वैशाली वाल्हेकर, निगारताई बारसकर, मीनाताई वाल्हेकर यांच्यासह मावळ लोकसभा मतदार संघातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

दरम्यान, भरत वाल्हेकर यांच्या नेतृत्वाखाली विविध पक्षातील पदाधिकाऱ्यांनी प्रणिती शिंदे यांच्या उपस्थितीत कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला. या बैठकीचे नियोजन इक्वाल शेख, गौरव खैरे, यश वाल्हेकर, आकाश खैरे, पूजा वाल्हेकर, अनन्या वाल्हेकर, ज्ञानेश्‍वर मलशेट्टी, विश्वनाथ जगताप, विश्वास गजरमल, गणेश कोळपे, बबलू पठाण, विकास कावळे, प्रशांत डोंगरे, विशाल गवळी, संदीप काटे, साहिल शर्मा, शुभम लकडे, राकेश कोकाटे, धावण कुमार, शिवाजी मदनसुरे, सुदर्शन धाडवे, श्रीमंत कोळपे, दिलीप सुतार, श्रीमती शिंपी ताई यांनी केले.

 

मावळवर दावा ठोकल्याने आश्‍चर्य

कॉंग्र्रेस हा राष्ट्रीय पक्ष असला, तरीदेखील मौळ लोकसभा मतदार संघात फारशी ताकद नाही. प्रणिती शिंदे यांनी मावळ लोकसभा मतदारसंघावर कॉंग्रेसचा दावा ठोकत असतानाच पिंपरी चिंचवड शहरातील पदाधिकाऱ्याला उमेदवारीचे संकेत दिले आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात आश्‍चर्य व्यक्‍त केले जात आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button