ताज्या बातम्या

शरद पवारांच्या बीडच्या सभेला गैरहजर का ? अमोल कोल्हेंनी सांगितलं कारण


राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या फुटीनंतर शरद पवारांनी दुसरी सभा धनंजय मुंडे यांच्या बीडमध्ये घेतली. याआधी शरद पवारांची सभा छगन भुजबळ यांच्या येवल्यात झाली होती.बीडमधल्या सभेत शरद पवार यांच्यासोबत जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड उपस्थित होते, पण खासदार अमोल कोल्हे यांनी या कार्यक्रमाला दांडी मारली, त्यामुळे पुन्हा एकदा चर्चा सुरू झाल्या. अखेर अमोल कोल्हे यांनी बीडच्या सभेला हजर न राहण्याचं कारण सांगितलं.’गैरहजर राहण्यावरून चर्चा करण्याची गरज नाही. आजचे अनेक कार्यक्रम पूर्वनियोजित होते, म्हणून आज सभेला जाता आलं नाही. जे काही संबंध मुंडे दादा म्हणता तेव्हा नातं वेगळं करता आलं पाहिजे. मी पार्लमेंटमध्ये राहून भूमिका मांडली, उगाच गॉसिप करू नका.

साहेब सांगतील तेच धोरण, साहेब बांधतील तेच तोरण,’ असं अमोल कोल्हे म्हणाले.’आजच्या सभेला तिकडे सगळे उपस्थित आहेत. पक्षाच्या कामाला निमंत्रणाची गरज नसते. पवार साहेब यांनी भूमिका स्पष्ट केली, उगाच चर्चा नको. कुठल्याही गॉसिपला अर्थ नाही.

  • लोण्याचा गोळा, त्यावर भांडणारे बोके, त्यापेक्षा सगळे चांगलं काम करू. माझ्याकडे कुठलीही ऑफर नाही, तुमच्याकडे काही माहिती असेल तर सांगा,’ अशी प्रतिक्रिया अमोल कोल्हे यांनी दिली. बावनकुळे यांना 2019 ला तिकीट नाकरलं, त्यांनी देशाचं राजकारण करणाऱ्या पवार साहेबांबद्दल बोलू नये, असा टोलाही अमोल कोल्हे यांनी लगावला.मागच्या बऱ्याच काळापासून अमोल कोल्हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाराज असल्याच्या चर्चा सुरू आहेत, पण अमोल कोल्हे यांनी प्रत्येकवेळी या चर्चांचं खंडन केलं. काहीच महिन्यांपूर्वी अमोल कोल्हे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचीही भेट घेतली होती, पण ही भेट चित्रपटासंबंधी असल्याचं त्यांनी सांगितलं. अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या आमदारांचा शपथविधी झाला तेव्हाही अमोल कोल्हे राजभवनामध्ये उपस्थित होते, पण नंतर त्यांनी आपण शरद पवारांसोबतच असल्याचं स्पष्ट केलं.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button