नगर-बीड-परळी रेल्वे प्रकल्पाच्या संथ गतीला महाविकास आघाडी सरकार जवाबदार

बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क करा. संपर्क : 9226040506

मुंबई- केंद्र आणि राज्य सरकारच्या समान भागीदारीने होत असलेल्या नगर-बीड-परळी रेल्वे प्रकल्पाच्या संथ गतीला नुकतेच सत्तेतून पायउतार झालेले महाविकास आघाडी सरकार जवाबदार असल्याचे वास्तव समोर आले आहे.राज्यातील महाविकास आघाडी सरकारने सत्तेच्या कार्यकाळात रेल्वे प्रकल्पाचा पाचशे ब्यानव कोटी रुपयांचा निधी थकवला आहे.तत्कालीन सरकारच्या उदासीनतेमुळे या प्रकल्पाच्या कामात मोठी खीळ बसली आहे,हा थकीत निधी प्रकल्पाच्या प्रगतीमध्ये अडसर ठरू शकतो.
बीडच्या खासदार डॉ.प्रितम मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या रेल्वे,जिल्हा प्रशासन आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या बैठकीत जिल्ह्यातील विविध विकास कामे आणि प्रस्तावित कामांचा त्यांनी आढावा घेतला.रेल्वे प्रकल्पासाठी सुरू असलेल्या अतिरिक्त भूसंपादनाचा आढावा घेत असताना तांत्रिक समस्या असलेल्या प्रकरणांचा निवाडा करून प्रकल्पाच्या कामाला गती देण्याच्या सूचना खा.प्रितम मुंडे यांनी केल्या.तसेच,थकीत निधी मिळवण्यासाठी पाठपुरावा करण्याचे निर्देशही त्यांनी जिल्हा प्रशासनाला दिले आहेत.

बीड जिल्ह्यातील अत्यंत वर्दळीच्या परळी-बीड मार्गाचे चौपदरीकरण करण्यासाठी तांत्रिक बाबींचा आढावा घेऊन प्रस्ताव सादर करा अशा सूचना खा.प्रितम मुंडे यांनी मार्च महिन्यात दिल्या होत्या, यासंदर्भात केलेल्या कार्यवाहीचा आढावा दिरंगाईसाठी अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघडणी केली. परळी – बीड मार्गाच्या चौपदरीकरणासाठी प्रस्ताव दाखल करा, आवश्यक बाबींची पूर्तता करण्यासाठी आम्ही पाठपुरावा करू असेही त्यांनी यावेळी सांगितले. तसेच बर्दापूर ते अंबाजोगाई दरम्यानच्या रस्त्याचे चौपदरीकरण करण्याच्या विषयावर मुंडे यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरत खडसावले,पुढील सात दिवसांच्या आत या रस्त्याच्या चौपदरीकरणाचा प्रस्ताव दाखल करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले.