ताज्या बातम्या
घरोघरी तिरंगा’ मोहिमेसाठी नवी मुंबई महापालिकेकडून १५ रुपयांत काठीसह तिरंगा मिळणार
नवी मुंबई – नवी मुंबई महानगरपालिका स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ‘घरोघरी तिरंगा’ मोहिमेअंतर्गत १३ ते १५ ऑगस्ट या कालावधीत आपल्या क्षेत्रातील नागरिकांना तिरंगा ध्वज सहजपणे उपलब्ध करून देणार आहे.
हेही वाचा – मानखुर्द – नेरुळ अप आणि डाउन हार्बर मार्गावर सकाळी ११.१५ ते सायंकाळी ४.१५ पर्यंत मेगाब्लॉक
हेही वाचा – नवी मुंबई : कांद्याच्या दरात पुन्हा वाढ ; घाऊक बाजारात कांदा २६ रुपयांवर
- याकरिता नवी मुंबई महानगरपालिकेच्या बेलापूर, नेरूळ, वाशी, तुर्भे, कोपरखैरणे, घणसोली, ऐरोली, दिघा या आठही विभाग कार्यालयांत विशेष केंद्रांची स्थापना करण्यात आली असून, १५ रुपये मात्र इतक्या सवलतीच्या दरात काठीसह तिरंगा ध्वज उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. सुट्टीच्या दिवशीही नवी मुंबई महानगरपालिकेच्या विभाग कार्यालयांतील केंद्रे सुरू आहेत, याची नागरिकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन नवी मुंबई महापालिकेमार्फत करण्यात आले आहे.