क्राईमताज्या बातम्या

धक्कादायक ! दारूच्या नशेत महिलेची काढली छेड, भररस्त्यात कपडे फाडले


हैदराबाद : देशातील महिला अद्यापही सुरक्षित नाहीत हे वारंवार दिसून येत आहे. तेलंगणची राजधानी असणाऱ्या हैदराबादमध्ये काळजाचा थरकाप उडवणारी घटना (crime news) घडली आहे.तेथे एका इसमाने महिलेची छेड काढत तिला निर्वस्त्र केले, एवढेच नव्हे तर तिला मारहाणही केली, अशी माहिती समोर आली आहे.

हैदराबादच्या बाहेरील भागातील बालाजी नगर येथे मद्यपी इसमाने (drunk man abused woman) एका 28 वर्षीय महिलेची छेड काढली आणि तिला जबरदस्तीने निर्वस्त्र केले. पेद्दामरैया असे आरोपीचे नाव असून रविवारी रात्री 8:30 च्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली.

महिलेने विरोध केल्यावर भडकलेल्या आरोपीने केले धक्कादायक कृत्य

30 वर्षीय आरोपी मद्यधुंद अवस्थेत रस्त्यावर चालत होता, तेव्हाच त्याने तेथील एका महिलेला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला. तेव्हा त्या महिलेने त्याला जोरात धक्का दिला आणि स्वत:ला वाचवण्याचा प्रयत्न केला. यामुळे आरोपी संतप्त झाला आणि त्याने त्या महिलेवर हल्ला करत बळजबरीने तिचे कपडे फाडले, तसेच तिला मारहाणही केली. धक्कादायक बाब म्हणजे, यावेळी आरोपीची आईदेखील त्याच्यासोबत होती, मात्र तिने त्याला रोखण्याचा किंवा त्या महिलेला वाचवण्याचा जराही प्रयत्न केला नाही. तेवढ्यात तेथे स्कूटीवरून आलेल्या दुसऱ्या महिलेने हा प्रकार पाहिला आणि आरोपीचा हल्ला रोखण्याच प्रयत्न केला.

15 मिनिटे ती रस्त्यावर तशीच निर्वस्त्र पडून होती

त्यामुळे संतापलेल्या आरोपीने दुसऱ्या महिलेवरही हल्ला केला. त्याच्यावर विविध कलमांखाली आरोप ठेवण्यात आले आहेत. आयएएनएसने दिलेल्या वृत्तानुसार, पीडित महिला सुमारे 15 मिनिटे रस्त्यावर निर्वस्त्र पडून होती. आरोपी घटनास्थळावरून फरार झाल्यानंतर आजूबाजूच्या महिला तिच्या मदतीसाठी पुढे आल्या व तिला वस्त्रांनी झाकले. त्यानंतर पोलिसांना याप्रकरणाची माहिती देण्यात आली.पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळत अटक केली असून पुढील कारवाई सुरू आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button