ताज्या बातम्या

‘हे’ आहे जगातील सर्वात पौष्टिक आणि वजनदार फळ


काटेरी, वजनदार, सर्व फळांमध्ये मोठे आणि अंडाकृती असलेले फळ म्हणजे फणस. श्रीलंका आणि बांगला देशाचे हे राष्ट्रीय फळ आहे. याशिवाय फणस तामिळनाडू आणि केरळ राज्यातही आढळणारे फळ आहे. हे फळ भाजी आणि फळाच्या स्वरुपात उपलब्ध आहे.
फळसाचे वजन 10 ते 25 किलोपर्यंत असते.उत्तर हिंदुस्थानात या फळाची शेती मोठ्या प्रमाणात होते. फणसाचे सेवन अनेक आजरांवर मात करण्यास फायदेशीर ठरते. बऱ्याच जणांना फणसाच्या गरांची भाजी आवडते. या झाडाला लागणाऱ्या फुलांमधूनच फणसाची निर्मिती होते. यामध्ये अ, क आणि थियामीन, पोटॅशियम, कॅल्शियम, रिबोफ्लाविन, नियासिन आणि झिंक यासारखी पोषक तत्त्वे असतात. फणसात फायबरचे प्रमाण जास्त प्रमाणात असते. अनेक आजारांवर ही भाजी खाणे हा रामबाण उपाय आहे. फणस हे श्रीलंका आणि बांगलादेशाचे राष्ट्रीय फळ आहे. याशिवाय तामिळनाडू आणि केरळचे हे राज्य फळ म्हणून ओळखले जाते.

– फणसाच्या सेवनान ह्रदय चांगले राहते. यामध्ये कॅलरीचे प्रमाण कमी असल्यामुळे रक्तदाबावर नियंत्रण मिळते.

– फणसात फायबरचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे पचनक्रिया सुधारते. यामध्ये असलेल्या लोहामुळे शरीरातील रक्ताची कमतरता दूर होण्यास फणस सहाय्यक ठरते.

– फणसाच्या सेवनाने रक्ताभिसरण चांगले राहते.

– पोटातील अल्सर दूर होण्यास मदत होते. पचनविकार दूर होतात.

– फणसाच्या सालीतून निघणारा चीक सांधेदुखी साठी चांगला असतो. शरीराच्या कोणत्याही भागावर काही कारणाने सूज असल्यास, किंवा लहान घाव असल्यास, फणसाच्या सालीतील चीक त्यावर लावावा. त्याने त्वरित आराम मिळतो. तसेच सांधे दुखत असल्यासही त्यावर फणसाच्या सालीच्या चिकाने मालिश केल्यास आराम मिळतो.

– फणसाच्या झाडाची कोवळी हिरवी पाने काही सेकंद चावून मग थुंकून टाकावीत. ह्या पानांच्या रसामुळे तोंडातील अल्सर, किंवा उष्णतेमुळे आलेले तोंड कमी होण्यास मदत होते.

– फणसामध्ये असणारी अनेक खनिजे शरीरातील होर्मोन्सना देखील नियंत्रित करीत असतात.

– फणसाच्या गऱ्याची पेस्ट बनवून त्यामध्ये थोडे दूध घालून ही पेस्ट चेहऱ्याला लावावी. काही वेळ ही पेस्ट चेहऱ्यावर तशीच राहू देऊन नंतर कोमट पाण्याने धुवून टाकावी. या उपायाने चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होण्यास मदत मिळते.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button